स्ट्रेचरवरून बाहेर गेला, तरी लंगडत बॅटिंगला आला, IND vs AFG सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारा क्षण | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

गाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा तब्बल 170 रननी विजय झाला आहे, पण या सामन्यात प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा क्षण मैदानात पाहायला मिळाला.

स्ट्रेचरवरून बाहेर गेला, तरी लंगडत बॅटिंगला आला, IND vs AFG सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारा क्षण
स्ट्रेचरवरून बाहेर गेला, तरी लंगडत बॅटिंगला आला, IND vs AFG सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

लखनऊ : अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा तब्बल 170 रननी विजय झाला आहे. भारताने दिलेलं 403 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा 44.3 ओव्हरमध्ये 232 रनवर ऑलआऊट झाला. अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रारला 3-3 तर प्रिन्स यादवला 2 आणि वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली.

या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर टीम इंडियाचा 49.5 ओव्हरमध्ये 402 रनवर ऑलआऊट झाला. कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या शतकामुळे भारताला एवढा स्कोअर करता आला. गिलने 110 बॉलमध्ये 154 तर इशान किशनने 79 बॉलमध्ये 125 रन केले. या विजयासोबतच टीम इंडियाने वनडे सीरिजमध्ये 2-0 ने अजेय आघाडी घेतली आहे.

लाईव्ह सामन्यात आलं स्ट्रेचर

अफगाणिस्तानच्या 26 वर्षांचा खेळाडू दारविश रसूली याने या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण त्याच्यासाठी वनडे डेब्यू त्रासदायक राहिला. लाईव्ह सामन्यामध्येच दारविश रसूलीला स्ट्रेचरवरून बाहेर न्यावं लागलं. यानंतरही टीमला गरज होती तेव्हा दारविश बॅटिंगला आला, पण तो फारवेळ क्रीजवर टिकू शकला नाही, त्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन तो मैदानाबाहेर गेला.

दारविशला काय झालं?

अफगाणिस्तानची फिल्डिंग सुरू असताना दारविश रसूलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. फिल्डिंग करत असताना दारविश मैदानातच विव्हळायला लागला, तेव्हा अफगाणिस्तानचा फिजियो मैदानात आला, पण दारविशला जास्त त्रास होत असल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आलं. यानंतर दारविश रसूली अफगाणिस्तानची बॅटिंग सुरू असताना पाचव्या क्रमांकावर बॅटिंगलाही आला, पण फक्त 6 बॉल खेळल्यानंतर तो मैदानातच कोसळला, त्यामुळे पुन्हा एकदा रसूलीला अफगाणिस्तानच्या सपोर्ट स्टाफने खांद्याचा आधार देऊन बाहेर नेलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *