प्रसादने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने पांढरी पट्टी हटवल्यानंतर त्याच्यासोबत काय काय घडत आहे ते सगळं सांगितलं आहे. त्याने आपल्यासोबत काहीही होईल अशी भीती व्यक्त केली आहे. नेमकं प्रसादसोबत काय घडतं आहे, तो नेमकं काय म्हणाला?
प्रसाद व्हिडीओत म्हणाला, “आमच्या सोसायटीमध्ये जो पांढऱ्या पट्टीचा वाद झाला, त्याच्यानंतर पूर्ण आयुष्य आमचं बदललेलं आहे. 4 तारखेला वाद झाला, 8 तारखेला त्यांना आम्ही भेटलो, 9 तारखेला ती पट्टी ज्यांनी मारलेली त्यांनी बुजवली. त्याच्यानंतर 11 तारखेला आमच्या इथल्या नगरसेवकांनी पोलिसांना एक लेटर दिलं आणि माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली.
या सगळ्यामध्ये बरीच लोकं आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. पाठलाग केला जातोय. घरी माणसं पण आलेली, आम्हाला दाबण्यासाठी, धमकावण्यासाठी आणि या सगळ्याचे साक्षीदार माझे आई-वडील, माझे सासरे, माझा भाऊ, माझी बायको दीपिकाआहे.
मी तुम्हाला हे आता सांगतोय कारण की मला माहिती नाही माझं काय होईल पुढे. माझ्यावर प्रत्येक बाजूनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय आणि मला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा किंवा असं काही मिळत नाहीये. मनसेच एक आहे ज्यांनी मला पूर्ण सपोर्ट दाखवला. राज साहेब, अविनाश दादा, संदीप सर…
प्लीज, जर माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झालं, जर यांनी मला कुठेही कसंही अडकवलं, तर तुम्हाला सगळं जे काही सत्य आहे, जे खरं आहे ते माहिती आहे. हा वाद या पट्टीपासून सुरू झाला आणि आता याला भलतीच दिशा दिली जात आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, कुठूनही येऊ शकतो आणि म्हणून मला मुख्यमंत्र्यांना पण एक निवेदन करतोय मी इकडे की, प्लीज सर… खूप चुकीचं सुरू आहे, फार चुकीचं सुरू आहे.
प्लीज माझ्याबद्दल जाणून घ्या मी काय आहे. मी कशाप्रकारे फॉलोअर्स कमावले आहेत, माझे लोक मला काय मानतात, माझं कॉन्ट्रिब्युशन काय आहे या देशासाठी… प्लीज हे जाणून घ्या आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीची पूर्ण तपासणी करा. कारण की बऱ्याच लोकांची मनं दुखली आहेत, बरेच खोटे गोष्टी माझ्या विरोधात स्प्रेड केल्या गेल्या आहेत. अशा गोष्टी ज्या मी बोललोच नाहीये, त्याच्यामुळे एक नेगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झालाय आणि सगळे नुसते माझ्या जीवावर उठलेत. त्यामुळे ही एक हेल्पलेस अपील करतोय मी सगळ्यांना. माझं पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, माझा माणुसकीवर पूर्ण विश्वास आहे, माझा माझ्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे. पण त्याचबरोबर पूर्णपणे यंत्रणा माझ्या मागे लागलेली आहे, हे मी सांगतोय तुम्हाला.
कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असेल, मला नाही माहिती यापुढे काय होणार आहे ते. मला माझे जे आतमधले कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांच्याकडून कळलंय की माझ्याविरोधात गुन्हा दाखल ऑलरेडी झालेला आहे आणि तो भलत्याच व्यक्तीने, भलत्याच संदर्भात केलेला आहे आणि त्याच्यात हे जे जिहादी-बिहादी शब्द आहेत हे टाकले गेलेले आहेत. तर प्लीज, हे सगळं नका करू तुम्ही.
आमच्या जमिनीवर आम्हाला दाबलं आणि मी त्याच्या विरोधात आवाज उठवला, तर आता पूर्णपणे मला त्रास दिला जातोय. अकाउंट सस्पेंड केले जातात, मास रिपोर्टिंग केली जाते. मी किंवा माझं कुटुंब, माझी बायको हे डिझर्व्ह करत नाही. आम्हाला न्याय हवा. प्लीज आम्हाला मदत करा. मी पूर्ण जैन समाजाकडू, प्रत्येकाकडून मदत मागत आहे. या क्षणी आम्हाला फक्त मदत हवी आहे.
खूप चुकीचं होतंय. मला पूर्ण माझ्या परिवाराची चिंता आहे. मी एकटा… मी मुख्य माणूस आहे. जर यांनी मला अटक केली तर सगळं उद्ध्वस्त होईल. मी कर्ता आहे घराचा आणि मी कधीच आयुष्यात कोणतंही चुकीचं काम केलं नाहीये. मी चुकीचं काम नाही करू शकत. मी खोट्या एफआयआर, खोट्या एनसीआय… हे मला नाही जमत. प्लीज हे समजा. ज्यांनी रेघ मारली ते चुकीचं की जो आवाज उठवतो तो चुकीचा? एवढी साधी गोष्ट आहे.