‘शिंदे साहेबांच्या ठिकऱ्या उडवायचा विचार केला तर…’; शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याच्या टीकेवरुन प्रताप सरनाईकांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार


Pratap sarnaik on sanjay raut: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, संजय राऊत यांच्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Pratap sarnaik on Sanjay raut mahayuti election plan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक राजकारणातले अनेक मोठे चेहरे आता पक्षांतरेही करताना दिसत आहेत. तर मोठे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही प्रमुख आघाड्या या निवडणुकांना एकत्रपणे सामोरे जाणार की नाही या प्रश्नाचं उत्तरही अजूनतरी अनुत्तरीतचं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. ते म्हणाले होते की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला बैठकीला जात आहेत, याचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ते त्यांचा पक्ष विलीन करणार आहेत. यावर आता परिवहन मंत्री व शिंदेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “संजय राऊत यांना स्वप्नं पडत असतात. कधी राहुल गांधी पंतप्रधान झाल्याचं, तर कधी मुंबई महापालिकेवरती सत्ता आल्याचं, तर कधी स्वतः मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न संजय राऊतांना पडतं आणि ते दिवसा त्या गोष्टी बोलत असतात.”, असा जोरदार पलटवार सरनाईकांनी केला आहे.
Maharashtra TimesNanded News: ‘मंगल माझ्याशी लग्न कर!’; दहा वर्ष मोठ्या प्रेयसीशी करायचे होते लग्न, नकार मिळाल्याने घेतला जीव, नांदेडमध्ये खळबळ

महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार

नितेश राणे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा हे युतीबाबत निर्णय घेतात. नितेश राणे किंवा अजून कोणी काही म्हटलं तरी यावरती काहीही परिणाम होत नाही. येणाऱ्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार, असं सरनाईक म्हणाले आहेत.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, असा प्रश्न विचारला असता “ठाकरे बंधू नाही ,अनेक ठाकरे आहेत. सगळ्यांनी एकत्र आले तर काय, ठाकरे कुटुंब मोठे आहे. त्याचबरोबर कुटुंब म्हणून पवार कुटुंबांनीदेखील एकत्र आले पाहिजे”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

मात्र कोणीही एकत्र आलं तर महायुतीला धक्का बसणार नाही, असं कधीही होणार नाही, शिंदे साहेबांच्या ठिकऱ्या उडवायचा विचार केला तर, शिंदे साहेब टिपऱ्या त्यांच्या हातात देतील, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. दरम्यान, पंढरपूरमध्ये कार्तिक वारीच्या नियोजनासाठी आज पंढरपूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आले होते. तेव्हा त्यांनी हा पत्रकारांशी संवाद साधला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा