वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप, विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, रोहित पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल


Pune : वारकरी संप्रदाय विषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्यात 8 मे रोजी विकास लवांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लवांडे यांच्या विरोधात बी एन एस कलम 299, 302, 196 (1) या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लवांडेंना ताब्यात घेतल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

युट्युब वर मिळालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून लवांडे यांनी वारकरी संप्रदाय विषयी आक्षेपार्य विधान केला असल्याचा आरोप एका महिलेने केला होता. संबंधित महिलेने यानंतर वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने लवांडे यांनी आज न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळं पोलिसांनी आज लवांडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु केली आहे. 

पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..

विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत आपली भूमिका व्यक्त केली आहे. लवांडेंनी एक्सवरती पोस्ट करत म्हटलं की, एका खोट्या फिर्यादीवरून मला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत, अशी माहिती देखील विकास लवांडे यांनी दिली आहे. 

महतवाच्या बातम्या:

Vikas Lawande : शाईफेक झालेल्या विकास लवांडेंना अटक, शाई फेकणारे संग्राम भंडारे मोकाट, चोर सोडून संन्यासीला फाशी, लवांडेंचं टीकास्त्र

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *