Bhiwandi Crime News : राज्यभरात आज दोन विभागांनी धडक कारवाई केली आहे. भिवंडीत एफडीए तर वडाळ्यात शिधा वाटप नियंत्रक विभागानं कारवाई केली आहे. भिवंडीत बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा साठा तर वडाळ्यात विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. भिवंडीत 1 कोटी 53 लाख तर वडाळ्यात 1 कोटी 23 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह पुरवठा नियंत्रक विभागाचे चंद्रकांत डांगे यांनी ही कारवाई केली आहे.
वडाळ्यात जप्त केलेला साठा
विमानाचे इंधन (ATF): 29000 लिटर
डिझेल: 14000 लिटर
पेट्रोल: 10000 लिटर
एकूण जप्त मुद्देमाल: 1 कोटी 31 लाख
भिवंडीत जप्त केलेला साठा
लहान मुलांसाठी बनवलेली बोगस उत्पादने
मुलांच्या केसांची व त्वचेची काळजी घेणारी उत्पादने (जसे की Peppa Pig मालिका, शॅम्पू, लोशन, पावडर, सनस्क्रीन) आणि पुरुषांची उत्पादने (‘KT Men’) विक्रीसाठी साठवून ठेवलेली आढळली.
दुधात भेसळ केल्याचा संशयातून कारवाई, दुधाचा साठा जप्त
दुधात भेसळ केल्याचा संशयातून अकोल्यातल्या अकोला अकोट रस्त्यावरील चौहट्टा बाजार येथे अन्न औषध विभागाकडून एका दुध डेअरीची तपासणी केली. येथील पेढे, दूध आणि इतर खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान दुधात भेसळ असल्याचा संशय या ठिकाणी झाला. त्यानंतर 33 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून हे भेसळीचं दूध अन्न व औषध विभागाकडून नष्ट करण्यात आले. एकंदरीत पेढे आणि दुधाचे तसे इतर खाद्यपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. चौथा बाजार येथील श्रीकृपा दुध डेअरीवर आज अकोल्याच्या अन्न व औषध विभागाने ही कारवाई केली आहे.
अहिल्यानगर कृषी विभागाची नेवासा तालुक्यात मोठी कारवाई, 21,80,486 रुपये किंमतीच्या खतांच्या 2034 गोण्या जप्त
अहिल्यानगर कृषी विभागाने नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील कृषी गौरव फर्टिलयझर प्रा.लि. कंपनीत धाड टाकून 21,80,486 रुपये किंमतीच्या खतांच्या 2034 गोण्या जप्त केल्या आहेत. संबंधित कंपनीला स्वतःचा खत उत्पादन आणि विक्रीचा परवाना असतांना देखील त्यांनी वेगवेगळ्या खत कंपन्याच्या नावाने खताचे उत्पादन, विपनन आणि अनधिकृत साठवणूक करुन शासनाची फसवणुक केल्याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कंपनीत बोगस खत निर्मिती आणि विक्री केली जात असल्याची तक्रार कृषी विभागाला प्राप्त झाली होती, त्यानुसार तपासणी केल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने या खतांचे नमुने ताब्यात घेतले आहे. तपासणी अहवालानंतरच या खतात भेसळ करण्यात आली आहे का? हे समोर येईल. मात्र स्वतःचा परवाना असताना संबंधित कंपनीकडे दुसऱ्या कंपन्यांचे खत मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न