लग्नाला गेलेल्या वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात, गडचिरोलीत दोन जणांचा जागीच मृत्यू, तर 17 जण जखमी 


Gadchiroli Accident News : लग्नाचा आनंदोत्सव सुरु असतानाच वरात संपवून परत येत असताना चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील सुरसुंडी जवळ घडली आहे. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गरोदर महिलेसह तब्बल 17 जण जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

धडकेनंतर बोलेरो रस्त्याच्या कडेला पलटी झाली आणि घटनास्थळी एकच आक्रोश पसरला

धानोरा तालुक्यातील मालेवाडा-येरकड मार्गावर सुरसुंडी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. धडकेनंतर बोलेरो रस्त्याच्या कडेला पलटी झाली आणि घटनास्थळी एकच आक्रोश पसरला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना बाहेर काढलं. लग्नसमारंभ आटोपून वरात परतत असताना हा अपघात घडल्याने संपूर्ण परिसर हादरलाय. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेला नसलं तरी जखमींवर उपचार सुरू असून पोलीस तपास सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याजवळ भीषण अपघाताची घटना, आई आणि मुलाचा जागीच मृत्यू 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. सांगली पलूस वरुन सांगोल्याकडे निघालेल्या इंडिका आणि ईरटीका गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला असून सहा जणं गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताच्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

जखमींवर सांगोला येथील रुग्णालयात उपचार सुरु 

आज दुपारी पलूस येथून निघालेले भोसले कुटुंब ईरटीका गाडीतून सांगोल्याकडे येत होते. यावेळी समोर जाणाऱ्या इंडिका गाडीचा टायर फुटल्याने गाडी कडेला घेत असताना याच गाडीवर मागून आलेली ही ईरटीका गाडी धडकली. यानंतर गाडीने जवळपास तीन ते चार कोलांट्या खात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. या अपघातात ईरटीका गाडी चालविणारा संदीप भोसले आणि त्याची आई रेखा भोसले यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. दोन्ही गाड्यातील मिळून जवळपास सहा गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सांगोला येथील रुग्णालयात उपचार सुरु झाले असून सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भातुंगडे याचा पुढील तपास करत आहेत.

मजलगावमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात एक जण जागीच ठार 

बीडच्या माजलगाव – सादोळा रस्त्यावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. सादोळा रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींची अबुजवाडी जवळ समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात कमलेश देवीदास गायके या 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या अपघातामुळे काही काळ सारोळा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *