‘राजकीय वरदहस्ताशिवाय…’; लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, आदित्य ठाकरे म्हणाले…


Aditya Thackeray: लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या या योजनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलंय?आणि कसा झाला आहे हा घोटाळा पाहूयात..

Aditya Thackeray criticized Ladki Bahin Yojana
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना सातत्याने विविध कारणाने नेहमी चर्चेत राहिली आहे.आता आज लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारच्या वरदहस्ताशिवाय हे घडणं अशक्य आहे, अशी टीका आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे.

आदित्य ठाकरेंनी याबाबत एक ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, “बोगस लाभार्थ्यांनी सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची बातमी ऐन दिवाळीत बाहेर येतेय. सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? योजनांच्या नावांआड जनतेच्या पैश्यांवर डल्ला मारायचा आणि सरकारी तिजोरी रिकामी करायची ही तर भाजपा-मिंधेची जूनी खोड आहे. मुंबई महानगरपालिकेतही तेच सुरु आहे.”

Maharashtra Timesशेतकऱ्याने स्वत:ला बैलाच्या जोडीला औताला बांधलं अन्… माजी खासदार भावनिक, दिलं विशेष गिफ्ट
पुढे त्यांनी लिहिलं की, “तर दुसरीकडे ऐन दिवाळीत आपले शेतकरी बांधव, आपला बळीराजा मदतीविना अंधारात आहे. अतीवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असं फक्त खोटं आश्वासन मिळालं, पण हाती काही पडलं नाही. पण सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, जनता सगळं पाहतेय, लक्षात ठेवतेय.”, असं आदित्य ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

योजनेत 164 कोटींचा घोटाळा कसा?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 12 हजार 431 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकाने दीड हजार लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सध्या या योजनेतील लाभार्थींची पडताळणी करणे सुरु आहे.

सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!

त्यातच या 12 हजार भावांनीही डल्ला मारल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभागातल्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असल्याचीही माहिती आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या 77 हजार 980 महिलांना यामध्ये अपात्र ठरवले गेले आहे, तर या 12 हजार बोगस पुरुष लाभार्थ्यांच्या खात्यात 24 कोटी व अपात्र बहि‍णींच्या खात्यांमध्ये 140 कोटी रुपये गेले आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा