Bollywood: बॉलिवूडच्या वर्तुळात एकेकाळी अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. इतकंच नाही तर रेखा राज बब्बर यांच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की त्या एकदा अनवाणी पायांनी त्यांच्या मागे धावत गेल्या होत्या, अशाही चर्चा रंगल्या होत्या. 80 च्या दशकात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर यांना रेखाचा आधार मिळाला होता. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. दरम्यान, राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर (Arya Babbar) याने नुकतंच या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
राज बब्बर यांच्यामागे रेखा धावत गेलेल्या?
विक्की लालवानी यांच्यासोबतच्या मुलाखतीत आर्यला रेखा आणि राज बब्बर यांच्या अफेअरच्या अफवांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी रेखा एकदा राज यांच्या मागे धावत गेल्या होत्या, या चर्चेचाही उल्लेख करण्यात आला. यावर आर्यने मिश्कील अंदाजात उत्तर दिलं. तसेच राज बब्बर रेखाकडे आकर्षित झाले होते का? असा प्रश्न विचारण्यात आला असता आर्य म्हणाला, “रेखा इतक्या सुंदर महिला आहेत की त्यांच्याकडे कोण आकर्षित होणार नाही? तुम्हालाही आकर्षण वाटेलच ना? मलाही वाटलं असतं. जर बाबा त्यांच्याकडे आकर्षित झाले असतील, तर त्यात चुकीचं काय आहे? शेवटी तेही माणूसच आहेत.” असं तो म्हणाला. 80 च्या दशकात रेखा आणि राज बब्बर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. अगर तुम ना होते, संसार आणि इन्साफ की आवाज यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. याच काळात त्यांच्या अफेअरच्या चर्चांनीही जोर धरला होता.
याच काळात रेखा आणि राज बब्बर एकमेकांच्या जवळ आले होते. अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राज बब्बर यांनी रेखासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. ते म्हणाले होते, “हो, आमच्या नात्याने एका अर्थाने मला मदतच केली. काही परिस्थितींमुळे आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. त्यावेळी रेखाचं दीर्घकाळ चाललेलं नातं तुटलं होतं आणि त्या त्या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या. मीसुद्धा त्याचसारख्या परिस्थितीतून जात होतो.”
आणखी वाचा