मोठी बातमी! शिवसेनेचा भाजपला पहिला मोठा धक्का, आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग – Marathi News | Shiv Senas first big blow to BJP important decision in MLA meeting big news regarding Legislative Council elections


Eknath Shinde, Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव विधान परिषदेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जळगावातील एका हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची गोपनीय आणि महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमधून आता मोठी बातमी समोर येत आहे.

जळगाव विधान परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटलांसह शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचं एकमत झालं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा ही शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, यावर शिवसेनेचे आमदार ठाम आहेत. महायुतीमध्ये जळगावची जागा शिवसेनेला मिळाली नाही तर भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत देऊ, असा निर्णय या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी घेतला आहे.

भाजपप्रमाणेच जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची देखील ताकद, त्यामुळे कुठलीही तडजोड करणार नसल्याची भूमिका या बैठकीमध्ये आमदारांकडून घेण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीनंतर आता जागा शिवसेनेला द्यावी, अथवा मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी देण्याबाबतची आग्रही भूमिका मांडण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्या एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर जळगावची जागा आणि उमेदवार निश्चित होईल, परवा शिवसैनिक फॉर्म भरताना दिसेल अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे, तर जळगाव विधान परिषदेची जागा शिवसैनिकच लढवेल आणि शिवसैनिक म्हणून उमेदवार प्रतापराव पाटील हेच राहातील असा दावा या बैठकीनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. दरम्यान आता ही जागा कोणाला मिळणार, इथे कोण उमेदवार असणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *