मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष – Marathi News | Shiv Sena demands seven seats from BJP for Legislative Council elections


जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच Image Credit source: टीव्ही 9 मराठी

राज्यात पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागंसाठी निवडणूक होणार आहे. या सर्व जागा स्थानाकि स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 25 मे ते 1 जून पर्यंत असणार आहे. तर दोन जूनला अर्जाची छानणी होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.  दरम्यान या 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.  या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून भाजप समोर आधीच्या 5 आणि नव्या 2 अशा 7 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शिवसेनेच्या या मागणीला भाजपकडून प्रतिसाद मिळताना दिसून येत नाहीये.

समोर आलेल्या माहितीनुसार भाजपनं शिवसेनेला विधान परिषदेच्या केवळ तीन ते चार जागाच देऊ केल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना सात जागांवर ठाम आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता आम्ही सात जागांवर ठाम आहोत, अशी भूमिका या विधान परिषद निवडणुकीत  शिवसेनेनं घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

जागा वाटपाचा पेच 

दरम्यान लोकसभा निवडणूक, त्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक आणि नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला तडजोड करावी लागल्याचं पहायला मिळालं. या प्रत्येक निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या तर शिवसेनेला कमी जागा मिळाल्या, यावरून शिवसेनेचे अनेक नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली  होती. मात्र मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे यावेळी मात्र शिवसेना सात जागांवर ठाम आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून भाजपकडे 7 जागांची मागणी करण्यात आली आहे, तर भाजपने तीन ते चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र शिवसेना सात जागांवर ठाम असल्यामुळे यावेळी जागा वाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *