uddhav thackeray on amit shah: उद्धव ठाकरेंनी आज अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी अमित शाहांना अॅनाकोंडा म्हणत मोदी शाहांवर जोरदार टीकास्र डागलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबईमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरळी डोमध्ये हा मेळावा पार पडत आहे. आज अमित शाहाही मुंबईमध्ये आहेत. त्यांनी आज मुंबईतील माझगाव डॉक येथे अत्याधुनिक नौकांच लोकार्पण केलं आहे. याच मुद्याला धरून उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली आहे. त्यांनी अमित शाहांना अॅनाकोंडा म्हटलं आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात.
“मुंबईवरती कोणाचा डोळा आहे हे तुम्हाला माहिती आहे. खासकरुन दोन व्यापाऱ्यांचा, आजचं एकजण येऊन गेला, आज काय योगायोग आहे माहित नाही. सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या, एक पहिल्या पानावर आहे, ती म्हणजे भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि दुसरी आतमध्ये आहे. जिजामाता उद्यानात लवकरचं अॅनाकोंडा येणार, आता आपण पेंग्विन आणले म्हणून लाखो पर्यटक वाढले, याचा मला अभिमान आहे.
Solapur News: द्राक्षबाग उद्ध्वस्त झालेल्या ‘त्या’ शेतकरी महिलेला आमदारपुत्राची भेट, शेतकरी महिलेचा पुन्हा टाहो त्यावरून काही पेंग्विनच्या उंचीची आणि बुद्धीची माणसं आपल्यावर टीका करतात ते सोडून द्या. पण, अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप. त्यांना मुंबई गिळायची आहे. बरं कशी गिळतोस तेच बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “भूमिपूजनाला आलास ना फोड ना नारळ, डोक्यावर फोड नाहीतर दगडावर फोड, एकच आहे. पण ते करतानासुद्धा घराणेशाहीवरती टीका. म्हणजे याचं कारटं क्रिकेट बोर्डावर मेरीटने झालंय, बरं घराणेशाही कोणाची ठाकरेंची? अरे उभा राहून दाखव समोर, म्हणून मला त्या अफदालीला सांगायचंय, की आम्ही आमच्या आईवडिलांचे ऋण माननारे पाईक आहोत. वारसदार आहोत. संजय राऊत म्हणाले तसं ब्रम्हचाऱ्यांची पिलावळ नाही, तुम्हा ब्रम्हचाऱ्यांना 40 पोरं झाली कशी? मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो, तिचं परिस्थिती भाजपची झाली आहे. गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं”, अशी घणाघाणी टीका उद्धव ठाकरेंनी भाजप व मोदी- शाहांवर केली आहे.
मुंबईमध्ये फक्त भगवाचं फडकवून दाखवणार असं सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान, या मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा