मी तुझ्यासोबत लग्न हे तुझ्या सौंदर्यासाठी नाही, तर..विवाहानंतर अवघ्या 60 दिवसात तेजश्री सर्वांना रडवून गेली – Marathi News | After wedding in just 60 days newlywed bride tejashree no more suspicion on greedy husband andhra pradesh case dowry matter marriage cheat


आपली मुलगी सासरी सुखी रहावी अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी श्रीमंत, सुखी-संपन्न घरात मुलीचं लग्न व्हावं अशी पालकांची इच्छा असते. मुलीला चांगलं सासर मिळणार असेल, तर आई-वडिल लग्नात पैसा खर्च करतानाही मागे-पुढे पाहत नाहीत. त्यासाठी ते ऊसनवारी करतात, कर्ज काढून मुलीचं लग्न धूम धडाक्यात लावून देतात. मुलीने सुद्धा डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न रंगवलेली असतात. तेजश्री सुद्धा याला अपवाद नाही. तेजश्रीच्या आई-वडिलांनी श्रीकाकुलमच्या अरगोलू येथे राहणाऱ्या दप्पा सोमेश्वर रावची निवड केली होती. त्यांना तो जावई म्हणून पसंत होता. आपण विशाखापट्टणमच्या डॉकयार्डमध्ये कामाला असल्याचं दप्पा सोमेश्वर रावने सांगितलं होतं. रामा टॉकीज भागात त्याच्या मालकीच एक महिला हॉस्टेल असून महिन्याला त्यातून 2 लाख रुपयाची कमाई होते असं त्यांने सांगितलेलं.

तेजश्रीचे आई-वडिल सुद्धा असा संपन्न घरातला जावई मिळाल्याने आनंदात होते. मुलगी एका श्रीमंत, सुखी कुटुंबात चाललीय म्हणून तिच्या आई-वडिलांनी कर्ज काढून 6 मार्च रोजी भव्य सोहळ्यात लग्न लावून दिलं. हुंडा म्हणून 18 लाख रुपये रोख, 19 तोळे सोनं आणि अन्य किंमती सामान. जवळपास 28 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम खर्च केली. पण मुलाचं ऐश्वर्य म्हणजे एक दिखावा होता. लग्नानंतर सोमेश्वर तेजश्रीला विखाशापट्टणम येथील आपल्या घरी घेऊन गेला. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा खरा चेहरा समोर आला.

त्याचे अन्य मुलींसोबत संबंध

सोमेश्वरने तेजश्रीा स्पष्ट शब्दात सांगितलेलं की, ‘मी तुझ्यासोबत तुझ्या सुंदरतेसाठी नाही, तर पैशासाठी लग्न केलय’ पोलीस चौकशीतून ही बाब समोर आली. लग्नाला अवघे दोन महिने झाले होते. पण हुंड्यासाठी लोभी पतीने तिला आयुष्यातून उठवलं. तेजश्रीने आत्महत्या केली असं तो सांगतोय. पण पोलिसांना तपासात तेजश्रीच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. कारस्थानपूर्वक केलेली ही हत्या वाटत आहे. आरोपी सोमेश्वर राव हुंड्यासाठी तिचा छळ करायचा. इतकचं नाही, तर पोलिसांना हे सुद्धा समजलं की, त्याचे अन्य मुलींसोबत संबंध होते. ते सुद्धा पती-पत्नीमध्ये वादाचं एक कारण होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *