मंत्रोच्चार करा, आरक्षण…प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टमुळे मोठा वाद, नको ते बोलून गेल्याने वादळ! – Marathi News | Devoleena bhattacharjee post controversy due to comment on reservation policy


Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मंत्रोच्चार आणि आरक्षणासंदर्भात तिने एका पोस्टवर आपले मत व्यक्त केले आहे. तिच्या या मतामुळे सोशल मीडियावर नवे वादळ उठले आहे. काही लोकांनी तिला पाठिंबा दिलाय. तर काही लोकांना मात्र तिच्यावर सडकून टीका केली आहे.

नोकरी न लागल्याने आरक्षणाला दोष

या संपूर्ण वादाची सुरुवात एक्स (X) वरील एका व्हिडिओपासून झाली. एका युजनरे एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये काही छोटी मुले वेदांचा अभ्यास तसेच मंत्रोच्चार करताना दिसत होते. हा व्हिडिओ देवोलीना भट्टाचार्जीने आपल्या एक्स खात्यावर शेअर केला आणि आपले मत व्यक्त केले. मुळ व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने अभ्यास करण्याच्या वयात मंत्रोच्चार करतात, नंतर नोकरी न लागल्याने आरक्षणाला दोष दिला जातो. हे लज्जास्पद आहे, असं मत व्यक्त केलं होतं. संबधित युजरला देवोलीना भट्टाचार्जीने उत्तर दिले आहे.

तिच्या याच पोस्टमुळे सोशल मीडियावर…

“एकदा मंत्रोच्चार करून पाहा, मग आरक्षणाची गरजच भासणार नाही. ज्ञानही मिळेल आणि इतरांनाही त्रास होणार नाही,” असं देवोलीना भट्टाचार्जी आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. तिच्या याच पोस्टमुळे सोशल मीडियावर मतमतांतरं निर्माण झाली आहेत. काही लोकांनी तिला पाठिंबा दिलाय. तर लोकांनी मात्र तिच्यावर टीका केलीय.

तिच्या विधानात कोणताही तर्क नाही

अनेकांनी देवोलीनाच्या वक्तव्यावर टीका करत तिच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंदिरांमध्ये पुजारी होण्याचा अधिकार सर्वांनाच नसल्याचे काहींनी नमूद केले, तर काहींनी तिच्या विधानात कोणताही तर्क नसल्याची टीका केली. काही युजर्सनी तिच्यावर राजकीय भूमिका घेतल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे तर तिच्या आंतरधर्मीय विवाहाचाही उल्लेख करत अनेकांनी तिला लक्ष्य केलं.

नीट पेपर लीक घोटाळ्यावरही मत व्यक्त

देवोलीना भट्टाचार्जी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. देशातील राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर ती आपले मत मांडत असते. नीट पेपर लीक प्रकरणामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तिने आता पंजाब, केरळ, कर्नाटकमधील शिक्षणमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, असं देवोलीना म्हणाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *