Mahad Crime: महाडमध्ये फेसबुकवरील मैत्री महिलेला खूप महागात पडली आहे. तिला वारंवार शारीरिक संबंधांसाठी ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड, अमुलकुमार जैन: महाड तालुक्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, नुकत्याच अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच, आता पुन्हा एका विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत दीड वर्ष ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सध्याच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाला खूप महत्व आलं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर हे प्लॅटफॉर्म सर्वजण वापरत आहेत. अनेकांची ऑनलाइन मैत्रीही होते. पण ही मैत्री प्रत्येकवेळी चांगली ठरेलं असं नाही. अनेकदा या प्रकारची ऑनलाइन मैत्री धोक्यात टाकते. असाच प्रत्यय नेमकाच महाड तालुक्यातील या घटनेने येतो आहे. महाडमध्ये एका महिलेला फेसबुकवरची मैत्री चांगलीच महागात पडली आहे. या मैत्रीमध्ये 38 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने संबंधित महिलेला ब्लॅकमेल करत तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. ऐन दिवाळीत कलाविश्वावर शोककळा! सुप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन
कसं घडलं सर्व प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणातील आरोपी हा ३८ वर्षांचा आहे. तर पीडित महिला ही विवाहित आहे. पीडित महिलेची आरोपीसोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी याने महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे संबंध दीड वर्ष चालले.
संबंध ठेवताना आरोपीने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले तसेच फोटोही काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तसेच पीडितेच्या नवऱ्याला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत, अडीच वर्ष तिला जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तिला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकाकच्या यातना दिल्या.
या कालावधीत आरोपीने पीडितेच्या गोरेगाव येथील राहत्या घरी आणि स्वतःच्या विक्रोळी, मुंबई येथील निवासस्थानीही तिच्यावर जबरदस्ती केली. दीड ते अडीच वर्ष पीडिता मानसिक तणावाखाली जीवन जगत होती. अखेर तिने धाडस करून महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा