‘नाही तर भाजपमध्ये ये…’ काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन पुन्हा काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर ‘काॅकरोच’च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी


Abhijeet Dipke Death Threat: सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपकेला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट ‘X’ (ट्विटर) वर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्यास किंवा मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. यामध्ये अमेरिकेतही मारून टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. (America mein bhi marwa denge) दुसऱ्या एका संदेशात फोन नंबर मिळाल्यामुळे पत्ता शोधायला वेळ लागणार नाही, असेही म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवर 2.1 कोटींहून अधिक फॉलोअर्स

दरम्यान, या धमक्या मिळण्याच्या एक दिवस आधीच कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत ‘X’ खाते भारतात कायदेशीर मागणीनुसार बंद (withheld) करण्यात आले होते. हे खाते सुरू झाल्याच्या अवघ्या पाच दिवसांतच बंद झाले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोच आणि परजीवी यांच्याशी केल्यामुळे उमटलेल्या प्रतिक्रियेतून या उपरोधिक (satirical) पक्षाची स्थापना झाली आहे. हा पक्ष स्वतःला आळशी आणि बेरोजगारांचा आवाज म्हणवतो. अवघ्या पाच दिवसांत या पक्षाने इन्स्टाग्रामवर 2.1 कोटींहून अधिक फॉलोअर्स मिळवले असून ही संख्या भाजपच्या फॉलोअर्सपेक्षाही जास्त आहे.

राजकीय आणि सामाजिक पाठिंबा

काँग्रेस नेते शशी थरूर, अखिलेश यादव, महुआ मोइत्रा, मनिष सिसोदिया यांसारख्या नेत्यांनी आणि अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा यांसारख्या सेलिब्रिटींनी या चळवळीला किंवा पक्षाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवला आहे. शशी थरूर यांनी पक्षाचे खाते बंद करण्याला चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे.

‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ 

दरम्यान, नीट घोटाळ्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या उपरोधिक (satirical) मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपकेनं  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका सुरू केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि नीट (NEET) परीक्षेतील गोंधळामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अभिजितने केला आहे. या मोहिमेला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.वाढलेल्या लोकप्रियतेमुळे पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेच्या आई-वडिलांना मोठी चिंता वाटत आहे. आपला मुलगा अडचणीत येऊ शकतो आणि त्याला अटकही होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत आहे.अभिजीतचे आई-वडील, भगवान आणि अनिता दीपके, छत्रपती संभाजीनगरला राहतात. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *