तुम्हाला फ्लाईट मोडचे ‘हे’ 3 आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का? – Marathi News | Do you know these 3 amazing benefits of flight mode


आजकाल वाढत्या तंत्रज्ञांमुळे भारतीय बाजारापेठेत नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. त्यामुळे आजकाल लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोन वापरताना पाहायला मिळतय. अशातच प्रत्येक मोबाईल वापरकर्त्यांना माहितच असेल की फोनमध्ये फ्लाईट मोड नावाचे एक फिचर असते. हे फोनचे खूप खास फिचर आहे. बऱ्याच लोकांना वाटते की हे फ्लाईट मोड फिचर फक्त विमानात प्रवास करताना वापरले जाते, पण तसे नाहीये. हे फिचर केवळ विमानातच नाही, तर इतर अनेक कामांसाठीही वापरले जाते. चला तर मग मोबाईलमधील फ्लाईट मोडचे असे आश्चर्यकारक फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

फ्लाईट मोड म्हणजे काय?

फ्लाईट मोड हे केवळ फोनवरच नव्हे, तर टॅब्लेट आणि लॅपटॉपवर मध्ये असलेले एक फिचर आहे. ही एक अशी सेटिंग आहे जी वाय-फाय, सेल्युलर डेटा आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी सर्व वायरलेस ट्रान्समिशन फिचर्स त्वरित बंद करते. हे फिचर्स प्रामुख्याने अशा उपकरणांना सिग्नल देण थांबवते, जे विमानाच्या कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन सिस्टीममध्ये व्यत्यय आणू शकतात.

हे आहेत फ्लाईट मोडचे फायदे

1- फ्लाइट मोड तुमच्या फोनवर येणारे सर्व वायरलेस सिग्नल ब्लॉक करते. जर फोनला मजबूत नेटवर्क कनेक्शन मिळत नसेल, तर तुमचा फोन सतत सिग्नल शोधत राहतो. यामुळे बॅटरी लवकर संपते. अशा परिस्थितीत फ्लाईट मोडचा वापर करणे खूप उपयुक्त ठरू शकतो. फ्लाईट मोड चालू केल्याने सिग्नल शोधण्याची प्रक्रिया थांबते, ज्यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपत नाही.

2- बरेच लोकं फोन चार्ज करताना इंटरनेट आणि लोकेशनसारखी फिचर्स चालू ठेवतात, पण जर तुम्हाला तुमचा फोन अधिक वेगाने चार्ज करायचा असेल, तर तुम्ही फोन चार्जिंग करताना फ्लाईट मोड चालू केल्याने सामान्य चार्जिंगच्या तुलनेत चार्जिंगचा वेग 20 ते 25 टक्क्यांनी वाढू शकतो. फोन लवकर चार्ज होतो.

3- जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी फोन देता तेव्हा त्यांच्याकडून चुकून फोनची सेटिंग्ज बदलणारे किंवा कॉल करणारे एखादे फीचर दाबले जाण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत एअरप्लेन मोड चालू करा आणि मोबाईल डेटा बंद करा. यामुळे मुले इंटरनेटचा वापर करू शकणार नाहीत आणि कोणाला कॉल देखील करणार नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *