महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी माहिती पुढे येतंय. या प्रकरणात थेट गुन्हाही दाखल करण्यात आला. थेट शिवसेना ठाकरे गटातील नेत्यावर आणि माजी खासदारावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर सूनेने गंभीर आरोप केले. या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा ही दाखल करण्यात आला. माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यासोबतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सूनेने केलेल्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी ठाण्याजील कापूरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखळ केला. अख्ख्या राऊत कुटुंबाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच 2 बाबा फिरोज बाबा आणि काजी बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटेनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अघोरी कृत्य आणि जादूटोणा राऊत कुटुंबियांकडून सुनेवर केला जात होता. माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पोलिस तक्रारीत कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. तक्रारीनुसार, राऊत कुटुंबियांनी तिचा मानसिक यासोबतच शारिरिक छळ केला. तिचे डोक्यावरील केस काढले. हेच नाही तर तिला तिची इच्छा नसतानाही बळजबरीने थेट गोमुत्र पाजले.
अनेक अघोरी विद्या तिच्यावर केल्या जात. अखेर तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. सासरे पती सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला. माजी खासदार विनायक राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला. यामुळे विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली.
पोलिस नक्की काय कारवाई करतात, हे पाहण्यासारखे ठरेल. सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर आता विनायक राऊत किंवा ठाकरे गटाचे नेते नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. मात्र, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचेही बघायला मिळतंय.