Jalgaon Crime News : जळगाव शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. निमखेडी रोडवर असलेल्या ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे.
जळगावात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे काळे रॅकेट उघडकीस
जळगावात पुन्हा एकदा रहिवासी भागात सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे काळे रॅकेट उघडकीस आले आहे. जळगाव शहरातील निमखेडी रोडवर असलेल्या ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक छापा टाकला. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या’ (AHTU) पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. या घटनेसंदर्भात पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
आणखी वाचा