अनेकदा तातडीने पैशांची गरज भासल्यास नोकरदार वर्गाला आपल्या PF खात्यातील पैसे कसे काढावेत, याबाबत अचूक माहिती नसते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आता पीएफ काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. तुम्ही कोणत्याही कार्यालयात न जाता, तुमच्या मोबाईलचा वापर करून अवघ्या काही मिनिटांत ऑनलाईन क्लेम करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.

घरी बसून मोबाईलवर PF चे पैसे काढा, अनेकांना सोपी पद्धत माहिती नाही
नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पगारातील काही भाग हा ‘भविष्य निर्वाह निधी’ म्हणजेच PF खात्यात जमा होतो. हा पैसा आपल्या कठीण काळात किंवा निवृत्तीनंतर कामाला येतो. अनेकदा वैद्यकीय आणीबाणी, लग्नकार्य, घराचे बांधकाम किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी आपल्याला PF च्या पैशांची गरज भासते. परंतु, PF चे पैसे काढण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतील किंवा एजंटला पैसे द्यावे लागतील, या भीतीने अनेक जण पुढे येत नाहीत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आता ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि अत्यंत सोपी केली आहे. तुम्ही कोणत्याही कार्यालयात न जाता, तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत घरबसल्या PF चे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम (PF Online Claim) करू शकता. ही सोपी पद्धत नेमकी काय आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
मोबाईलवरून PF काढण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत
स्टेप 1: EPFO पोर्टलला भेट द्या
सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर (उदा. Google Chrome) उघडा आणि EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर (unifiedportal-mem.epfindia.gov.in) जा. मोबाईलवर स्क्रीन नीट दिसण्यासाठी ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘Desktop Site’ मोड ऑन करा.
स्टेप 2: लॉगिन करा
तुमचा 12 अंकी UAN नंबर, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून ‘Sign In’ या बटनावर क्लिक करा.
स्टेप ३: ऑनलाईन सर्व्हिस निवडा
लॉगिन झाल्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या मेनू बारमधील ‘Online Services’ या पर्यायावर क्लिक करा. ड्रॉपडाऊन मेनूमधून ‘CLAIM (FORM-31, 19, 10C & 10D)’ हा पहिला पर्याय निवडा.
स्टेप 4: बँक खाते व्हेरिफाय करा
आता तुमच्या स्क्रीनवर तुमची वैयक्तिक माहिती दिसेल. तिथे दिलेल्या रकान्यात तुमच्या पीएफ खात्याशी लिंक असलेल्या बँक खात्याचा संपूर्ण नंबर टाका आणि ‘Verify’ वर क्लिक करा. त्यानंतर ‘Yes’ या बटनावर क्लिक करून अटी मान्य करा.
स्टेप 5: प्रोसिड फॉर क्लेम
बँक खाते व्हेरिफाय झाल्यानंतर खाली दिलेल्या ‘Proceed for Online Claim’ या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 6: क्लेमचा प्रकार आणि कारण निवडा
आता ‘I want to apply for’ या पर्यायामध्ये जाऊन जर तुम्ही सध्या नोकरी करत असाल तर ‘PF Advance (Form 31)’ हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला पैशांची गरज का आहे (उदा. आजारपण, लग्न, नैसर्गिक आपत्ती) ते कारण निवडा. तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत ती रक्कम टाका आणि तुमचा घरचा पत्ता भरा.
स्टेप 7: पासबुक किंवा चेकचा फोटो अपलोड करा
येथे तुमच्या बँक पासबुकचा किंवा कॅन्सल चेकचा (Cancelled Cheek) स्पष्ट फोटो अपलोड करा. (लक्षात ठेवा, या फोटोवर तुमचे नाव आणि बँक खाते नंबर स्पष्ट दिसणे गरजेचे आहे).
स्टेप 8: आधार OTP द्वारे प्रक्रिया पूर्ण करा
शेवटी, खाली दिलेल्या चेकबॉक्सवर टिक करा आणि ‘Get Aadhaar OTP’ वर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो ओटीपी टाकून ‘Validate OTP and Submit Claim Form’ वर क्लिक करा.
