काही तरी घडलंय! अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवरून 200हून अधिक पोस्ट केल्या डिलिट – Marathi News | Arshdeep Singh deleted more than 200 posts from Instagram what exactly could be the reason


काही तरी घडलंय! अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवरून 200हून अधिक पोस्ट केल्या डिलिटImage Credit source: IPL/BCCI

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सचं प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्सने चांगली सुरूवात केली होती. मात्र नंतर पराभवाची मालिका सुरू झाली आणि स्पर्धेतून आऊट झाला. पंजाब किंग्स स्पर्धेतून आऊट झाला असला तरी अर्शदीप सिंगची चर्चा काही संपत नाही. आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून अर्शदीप सिंग या ना त्या कारणाने चर्चेत आला होता. कथित गर्लफ्रेंडवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. आता त्याने इंस्टाग्रामवरून 200हून अधिक पोस्ट डिलिट केल्या आहेत. इतकंच काय प्रोफाईल फोटोही बदलला आहे. अर्शदीप सिंगने डिलिट केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहलीची व्हायरल झालेली पोस्ट आहे. तसेच काही पोस्ट पंजाब किंग्सशी निगडीत आहे. काही दिवसांपूर्वी अर्शदीप सिंग सोशल मीडियावर ट्रोलही झाला होता. तिलक वर्माबाबत केलेलं विधान त्याला भोवलं होतं.

अर्शदीप सिंगने पोस्ट डिलिट करण्याचं कारण काय?

पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने 200हून अधिक पोस्ट डिलिट केल्या. आता त्याच्या इंस्टाग्राम पोस्टची संख्या 40 आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवर 25 मे रोजी रात्री साफसफाई केली. पण त्या मागचं कारण काय हे मात्र अस्पष्ट आहे. याबाबत त्याने काही प्रतिक्रिया देखील दिली नाही. त्यामुळे त्याच्या कृतीने चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. चाहत्यांनी आपआपल्या पद्धतीने या कृतीचा अंदाज लावण्यास सुरूवात केली आहे. कदाचित सोशल मीडियावरून बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला असावा. काही जणांच्या मते त्याचं वैयक्तिक कारण असावं. तर काही जणं मोठं काहीतरी घडलं असावा अंदाज बांधत आहेत.

अर्शदीप सिंगने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान चर्चेचा एक व्हिडीओ टाकला होता. हा शतकासंदर्भातला व्हिडीओ होता. त्यावर विराट कोहलीने आपल्या शैलीत उत्तर देत अर्शदीप सिंगला तोंडावर पाडलं होतं. या व्हिडीओला 150 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. तर पंजाब किंग्सशी निगडीत काही पोस्ट त्याने डिलिट केले. पण अजूनही काही पोस्ट त्याच्या इंस्टाग्रामवर आहेत.

अर्शदीप सिंगची कामगिरी

आयपीएल 2026 स्पर्धत अर्शदीप सिंगने सुमार कामगिरी केली. त्याने 14 सामन्यात 541 धावा दिल्या आणि फक्त 14 विकेट घेतल्या. त्याने 10.21 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. त्याच्या सुमार कामगिरीचा फटका पंजाब किंग्सला बसला. एकंदरीत आकडेवारी पाहता पंजाब किंग्ससाठी प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक धावा केल्या. पण त्याच्यापेक्षा जास्त धावा या अर्शदीप सिंगने दिल्या. प्रभसिमरन सिंगने 14 सामन्यातील 13 डावात 510 धावा केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *