करिश्मा कपूरकडे मुलीच्या शाळेची फी साठीही पैसे नाहीत? सावत्र आईची कोर्टात याचिका – Marathi News | Karisma kapoor children fees priya kapur moves delhi high court seeking access to late sunjay kapur epf funds


करिश्मा कपूर आणि तिची मुलंImage Credit source: Instagram

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीमधील वाट्यावरून खूप मोठा सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान करिश्मा कपूरच्या मुलीने दावा केला होता की, तिच्या शाळेची दोन महिन्यांपासून फी भरली गेली नाही. त्यावर आता संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूरने कोर्टात याचिका दाखल केली आहे. करिश्माच्या समायरा आणि कियान या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी तिने दिल्ली हायकोर्टात निवेदन पाठवलं आहे. समायरा आणि कियान ही संजय कपूर आणि करिश्मा यांची मुलं आहेत. दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी प्रिया कपूरद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर औपचारिक नोटीस जारी केली आहे.

प्रिया कपूरने या याचिकेत तिचा दिवंगत पती संजय कपूरच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यांचे एक्सेस मिळवण्याची मागणी केली आहे. करिश्माच्या मुलांच्या शाळेची फी आणि शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं आहे. या निधीचा वापर फक्त शाळेची फी आणि त्यांच्या शिक्षणासाठी केला जाईल, असं प्रियाच्या कायदेशीर प्रतिनिधींनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं आहे.

संजय कपूरच्या कथित 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या वादात प्रिया कपूर, करिश्मा कपूरची मुलं आणि संजयची आई राणी कपूर यांच्यासह कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश आहे. जून 2025 मध्ये लंडनमध्ये पोलो खेळताना संजयचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या मृत्यूपत्रावर आक्षेप घेत करिश्माने तिच्या मुलांमार्फत कोर्टात प्रिया कपूरविरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने संजय कपूरच्या वैयक्तिक मालमत्ता आणि कॉर्पोरेट होल्डिंगची कोणतीही विक्री, हस्तांतरण किंवा विल्हेवाट लावण्यास मनाईचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या आदेशात संजयच्या मुलांशी संबंधित अत्यावश्यत जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मर्यादित वाव ठेवण्यात आला होता.

“घटस्फोटानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार संजयने मुलांचा खर्च भागवायचा होता. मुलांची मालमत्ता आता प्रिया कपूरकडे आहे आणि त्यामुळे सगळं तिच्यावर अवलंबून आहे”, अशी बाजू करिश्माच्या वकिलांनी कोर्टात मांडली होती. वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी टिप्पणी केली होती की, “मला या सुनावणीत मेलोड्रामा नकोय.” करिश्माची मुलगी समायरा अमेरिकेत शिक्षण घेते. तिची दोन महिन्यांची फी भरली गेली नाही, असा दावा जेठमलानी यांनी केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *