आजचे राशिभविष्य 27 मे 2026 : गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा,चंद्र आणि मंगळ बनवणार धनयोग ! पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते ?


Todays Horoscope 27 May 2026 : 27 मे बुधवार रोजी गणपतीची कृपा सर्वांवर असेल. आजच्या दिवशी गणपतीचे दर्शन अवश्य घ्यावे. आजच्या दिवशी काही भाग्यवान राशींवर बजरंगबली कृपा करतील. आज होणाऱ्या ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर होताना दिसेल. आज चंद्र तूळ राशीत प्रवेश करून गजकेसरी योग निर्माण करेल. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. आज गजकेसरी योगाचा काही राशींना फायदा होईल. तर आजच्या दिवशी चंद्र आणि मंगळ एकत्र येऊन धनयोग निर्माण करतील. पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते चला तर मग पाहुयात मेष ते मीन पर्यंत सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.

zdcsignnnn
Rashibhavishya 27 May 2026 : 27 मे बुधवार रोजी गणपतीची कृपा सर्वांवर असेल. आजच्या दिवशी गणपतीचे दर्शन अवश्य घ्यावे. आजच्या दिवशी काही भाग्यवान राशींवर बजरंगबली कृपा करतील. आज होणाऱ्या ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर होताना दिसेल. आज चंद्र तूळ राशीत प्रवेश करून गजकेसरी योग निर्माण करेल. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. आज गजकेसरी योगाचा काही राशींना फायदा होईल. तर आजच्या दिवशी चंद्र आणि मंगळ एकत्र येऊन धनयोग निर्माण करतील. चला तर मग मेष ते मीन पर्यंत सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊयात तुमची राशी काय सांगते? तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क रहावे लागणार कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा मेष ते मीन राशींचे दैनिक राशिभविष्य.

मेष : कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल

मेष : कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल

आजचा दिवस आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील. दिवसभरात नोकरी किंवा व्यवसायात थोडा तणाव किंवा संघर्ष होऊ शकतो. मात्र तुम्ही केलेले परिश्रम व प्रयत्नांचा आज तुम्हाला फायदा मिळेल. कुटुंबात सुख-शांती व सौख्य मिळेल. प्रेमजीवनात जवळीकता राहील. कार्यक्षेत्रात सुरुवातीला मंदी असेल नंतर वेग येईल.
आज भाग्य ८१ टक्के साथ देईल. गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा.

वृषभ : सुखसाधनांची प्राप्ती होईल

वृषभ : सुखसाधनांची प्राप्ती होईल

आज चंद्राचे गोचर पंचम नंतर सहाव्या स्थानात होईल. दिवसाची सुरुवात उत्साहजनक राहील. कार्यक्षेत्रात तुम्हाला सहकाऱ्यांची अपेक्षित मदत मिळेल. कौटुंबिक जीवनही तुमच्यासाठी अनुकूल असेल. वाहनं व सुखसाधनांची प्राप्ती होईल. एखाद्या मित्राकडून गिफ्ट मिळेल. मात्र आज विरोधकांपासून सावध राहा.
आज भाग्य ८४ टक्के तुमच्यासोबत असेल. किन्नरांना बांगड्या दान करा.

मिथुन : प्रयत्नांना पूर्ण लाभ मिळेल

मिथुन : प्रयत्नांना पूर्ण लाभ मिळेल

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज नोकरी व्यवसायात नवीन गोष्टी करण्याची संधी मिळेल. तुमच्या मनात काही नवीन विचार येतील जे तुम्हाला पुढे घेऊन जातील. आर्थिक प्रयत्नांना पूर्ण लाभ मिळेल. शिक्षण क्षेत्रातही तुमचं प्रर्दशन चांगलं होईल. नवीन कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्यासोबत असेल. ॐ गं गणपतये नमः मंत्र जपा.

कर्क : कमाई वाढेल

कर्क : कमाई वाढेल

आजचा दिवस सुखकारक राहील. राशीचा स्वामी चंद्राचे गोचर तुमच्या तृतीय नंतर चतुर्थ स्थानात होईल. त्यामुळे केलेल्या प्रयत्नांचा लाभ दुसऱ्या भागात मिळेल. तुम्ही कोणत्यातरी पार्टी किंवा मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद आज घेऊ शकता. कुटुंबात पालकांचे स्नेह व सहकार्य मिळेल. व्यवसायात कमाई वाढेल. एखाद्या मोठ्या इच्छेची पूर्ती होईल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्यासोबत असेल. श्रीदुर्गा चालीसा वाचन करा.

सिंह : प्रवासाची शक्यता

सिंह : प्रवासाची शक्यता

आजचा दिवस आर्थिक प्रयत्नात यशदायक राहील. राजकीय संपर्क व वाणीची कुशलता फायदा देईल. वडिल व काकापासून कामात किंवा व्यवसायात मदत मिळू शकते. प्रवासाचीही शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल. सरकारी क्षेत्रात यश येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात संतुलन राखा.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्यासोबत असेल. मूगडाळ दान करणे शुभ.

कन्या : व्यवसायात वाढ होईल

कन्या : व्यवसायात वाढ होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. तुमचे लग्न व चंद्राचे गोचर दुसऱ्या स्थानात होईल. त्यामुळे व्यवहारिक व संतुलित जीवनशैली जपाल. कार्यकौशल्य व अनुभव आज कामात मिळतील. जवळचे स्नेही लाभ देतील. व्यवसायात वाढ होईल. शिक्षणात नवीन गोष्टी शिकाल. सासरकडून मदत होईल. बुधाच्या उपस्थितीमुळे भाग्य साथ देईल. अनपेक्षितपणे काही काम पूर्ण होईल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्यासोबत असेल. गणेशाला सिंदूर व दूर्वा अर्पण करा.

तुळ : इच्छा पूर्ण होईल

तुळ : इच्छा पूर्ण होईल

दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, पण नंतर तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. मित्र व परिचितांकडून लाभ होईल. मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांकडून मदत मिळू शकते. संध्याकाळ मनोरंजक राहील. जोडीदार कामात सहकार्य करेल. आवडीचे पदार्थ खायला मिळाल्याने आनंद होईल. मित्रांकडून मदत मिळेल.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्यासोबत असेल. श्रीसूक्त वाचन फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : खर्च वाढू शकतो

वृश्चिक : खर्च वाढू शकतो

आजचा दिवस तुम्हाला आर्थिक बाबतीत लाभदायक राहील. काम सोपे व सुरळीत चालेल. अडथळा येणारे काम पूर्ण होईल. महत्वाची कामे दिवसभरात पूर्ण करावीत. अचानक खर्च अधिक होऊ शकतो. वाहन अथवा तब्येतीसंदर्भात खर्च येऊ शकतो. जोडीदारा सोबत वाद घालण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्यासोबत असेल. श्रीगणेश चालीसा पठण करा.

धनु : प्रयत्नांना योग्य फळ मिळेल

धनु : प्रयत्नांना योग्य फळ मिळेल

धनु राशींसाठी आजचा दिवस मिश्र राहील. विचार सकारात्मक ठेवा. नोकरीत कामाचा ताण असेल मात्र थोडा संयम बाळगा. प्रयत्नांची फळे निश्चित मिळतील. तब्येतीची काळजी घ्यावी, वाणीवर नियंत्रण हवे. अनवश्यक खर्च टाळावेत. धर्म व कर्माकडे आज जास्त कल असेल. ऑनलाईन खरेदी टाळा.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्यासोबत असेल. गाईला हिरवा चारा द्या.

मकर : फायद्याच्या योजनेतून लाभ

मकर : फायद्याच्या योजनेतून लाभ

मकर राशींसाठी आजचा दिवस भाग्य वाढवणारा राहील. तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायला आवडेल. नोकरीत वरिष्ठांची मदत मिळेल. आर्थिक योजना पुढे जतील. फायदेशीर योजनेत सहभागी व्हाल. प्रवासाची शक्यता आहे. विदेशी कामात लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज सुख-संपत्ती मिळतील.
आज भाग्य ८७ टक्के तुमच्यासोबत असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा.

कुंभ : अनुभवी व्यक्तीकडून मदत मिळेल

कुंभ : अनुभवी व्यक्तीकडून मदत मिळेल

आज व्यवहार करताना सावध राहा. कोणत्याही लालच मध्ये येऊन चुकीच्या संधी घेणे टाळावे. जबाबदारीने कामात वागा. नोकरीत संयम बाळगा. संध्याकाळ पर्यंत तुमची कामं हलकी होतील. अनुभवी व्यक्तीकडून मदत मिळेल. दीर्घकालिक योजनांची वाट पहावी. राजकीय व सरकारी कामात यश मिळेल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्यासोबत असेल. मोरपंख पाकिटात ठेवा.

मीन : आर्थिक व्यवहारात सावध राहा

मीन : आर्थिक व्यवहारात सावध राहा

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. चंद्राचे गोचर तुमच्या राशीच्या सप्तम व अष्टम स्थानांत होईल. त्यामुळे सावधपणे काम करा. इतरांच्या बोलण्यात येऊ नका. आर्थिक व्यवहारात सावध राहा. भागीदारांशी जुळवाजुळव करा, नाहीतर वाद होऊ शकतो. खर्चावर लक्ष द्या. तब्येतीची काळजी घ्यावी. आज ध्यान करा व देवाची पूजा करा.
आज भाग्य ८० टक्के तुमच्यासोबत असेल. गरजूंना अन्नदान करा.

प्रियांका लोंढे

लेखकाबद्दलप्रियांका लोंढेप्रियांका लोंढे महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन सेक्शन मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर आहेत. गेल्या 10 वर्षांपासून मीडिया क्षेत्रात जर्नालिस्ट,कंटेन्ट रायटर म्हणून काम करत आहेत. धार्मिक, सांस्कृतिक,कला,सामाजिक,चित्रपट,वुमन इश्यू,मनोरंजन,वाईल्डलाईफ अशा विविध क्षेत्राशी निगडीत अनेक विषयांवर त्यांनी बातम्या आणि लेख लिहिले आहेत. धार्मिक विषयात लहानपणापासूनच रुची असल्याने व घरातील वातावरण देखील धार्मिक असल्याने त्यांनी पूजापाठ,व्रत,पारायण याची शिकवण आपल्या आईकडून घेतली. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांची आई दत्तगुरूंची सेवा करते. घरात पारायण होतात धार्मिक यात्रा दरवर्षी कुटुंब करते याच गोष्टी त्यांनी बालपणापासून पाहिल्या व आत्मसात केल्या. त्या स्वतः हनुमानजींची भक्ती करतात. आपल्या धार्मिक अनुभवांवरून लेखन करताना वाचकांपर्यंत सत्य धार्मिक लेख,कथा ज्योतिष उपाय त्यांच्या लेखनातून पोहचवतात.

प्रियांका लोंढे यांनी मास्टर इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन टीममध्ये कार्यरत असून ज्योतिष,टॅरोट कार्ड्स,अंकशास्त्र,धार्मिक कथा कहाण्या यामध्ये त्यांना आवड असल्याने त्यांनी यासर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे. आपल्या लेखातून त्या नेहमी ज्योतिषीय बातम्या लिहिताना तथ्य पडताळून योग्य संदर्भ देऊन वाचकांपर्यंत सत्य माहिती पोहचवतात. या बाबतीत त्यांना स्वतःचे अनुभव कामी येतात. प्रियांका स्वतः धार्मिक असल्याने त्या अनेक तीर्थस्थळी यात्रा करतात. आपल्या यात्रेतील अनुभव पाठीशी घेऊन तसेच दैनंदिन पूजापाठ कशाप्रकारे करावी संकल्प कसा घ्यावा मनोकामना प्राप्तीसाठी काय करावे हे सर्व त्या स्वतः अनुभव घेऊन आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत पोहचवतात त्यामुळे त्यांचे लेख वाचकांच्या जास्त जवळ जाऊ शकतात व वाचकांना योग्य ती माहिती मिळते.

धार्मिक लेखनासोबतच प्रियांका लोंढे यांनी महिलांसाठी लेखन केले आहे. त्यांनी लोकमत या वृत्तपत्रात असताना नाईट शिफ्ट करणाऱ्या महिला रात्री प्रवास करताना सुरक्षित असतात का या बाबतीत लोकमत टीमसोबत स्टिंग ऑपरेशन केले होते. ही बातमी वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचली व त्यांच्या टीमचे कौतुक झाले. या स्टिंग ऑपरेशनसाठी त्यांना “रणरागिणी” हा पुरस्कार मिळाला होता. सामाजिक संस्थांसोबत जोडून त्यांनी अनाथ मुले,महिला यांच्या समस्या आपल्या लेखनातून समाजासमोर मांडल्या. सध्या त्या धार्मिक लेखन करत असून आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहचवता यावी यावर विशेष लक्ष देतात. प्रियांका आपल्या लेखात काही ज्योतिष उपाय सांगतात जे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून असतात शिवाय लाल किताब किंवा ज्योतिष एक्सपर्ट यांनी दिलेल्या माहितीवर आधारित लेख त्या लिहितात.

शिक्षण व कार्य अनुभव
– प्रियांकाने 4 वर्ष लोकमत वृत्तपत्रात विविध विषयांवर पत्रकार म्हणून लेखन केले. त्यांनी अनेक स्टोरीज या एक्लुझिव्ह लिहिल्या आहेत. लोकमतसाठी मनोरंजन विभागात काम करताना बऱ्याच सेलिब्रिटीजचे इंटरव्यू घेतले. तसेच अनेक चित्रपटांचे रिव्ह्यू देखील केले आहेत. क्राईम बीटसाठी काम करताना स्टिंग ऑपरेशन केले आहेत.
– ईटीव्ही मराठीमध्ये एंटरटेनमेंट डेस्कसाठी कंटेन्ट एडिटर म्हणून काम केले आहे.
– महाराष्ट्र मीडिया पीआर कंपनीमध्ये VSTF या महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी काम केले. तसेच अनेक नामांकित ब्रँडसाठी कंटेन्ट रायटिंग केले आहे.
– ब्लूपॅड या अँपमध्ये अनेक विषयांवर 1000 हुन अधिक लेख लिहिले आहेत.
– एस्ट्रोटॉक या अँपमध्ये देखील कंटेन्ट रायटर या पदावर काम केले आहे. ज्योतिषीय विषयांवर अभ्यास व रिसर्च करून लेखन केले आहे.
– प्रियांका सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉमच्या एस्ट्रो रिलिजन सेक्शनसाठी कार्यरत आहे. येथे त्या ज्योतिष व धार्मिक विषयांवर स्वतःचे अनुभव, अभ्यास व रिसर्च करून लेख लिहितात.आणखी वाचा