अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार


Bangladesh Allow the US to Use the Key Ports: बांगलादेशने अमेरिकेला दोन महत्त्वाची बंदरे वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही एक करार झाला आहे.वृत्तानुसार, अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात एकूण तीन मोठे करार झाले आहेत. या करारांमुळे बंगालच्या उपसागर प्रदेशात अमेरिकेची उपस्थिती आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढू शकतो. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेला बांगलादेशच्या चित्तगोंग आणि मातरबारी बंदरांचा वापर करण्याची परवानगी मिळेल. ही बंदरे अमेरिकेच्या नौदल आणि लष्करी जहाजांद्वारे वापरली जातील. यामुळे अमेरिकेला हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागर प्रदेशात आपली लष्करी आणि सामरिक शक्ती वाढविण्यात मदत होईल. चित्तगोंग बंदर भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांपासून फक्त 1100 किमी अंतरावर आहे.

अमेरिकेची नजर मलाक्काच्या सामुद्रधुनीवर

मेरिकेची विशेष नजर मलाक्काच्या सामुद्रधुनीवर आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक मानला जातो. जगातील सुमारे 60 टक्के सागरी व्यापार या मार्गातून होतो. तेल, वायू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवून अमेरिका चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवू इच्छिते.

बांग्लादेश-अमेरिका यांच्यातील तीन प्रमुख करार

  • दोन बंदरांच्या वापरासाठी करार – अमेरिकेला बांगलादेशची चित्तगोंग आणि मातरबारी बंदरे वापरण्याची परवानगी दिली जाईल. अमेरिकेची युद्धनौका आणि लष्करी जहाजे या बंदरांना भेट देऊ शकतील.
  • गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करार – दोन्ही देश एकमेकांना लष्करी आणि सुरक्षाविषयक गुप्त माहितीची देवाणघेवाण करतील. सागरी हालचाली आणि सुरक्षेवर संयुक्तपणे लक्ष ठेवले जाईल.
  • लष्करी आणि सामरिक सहकार्य वाढवण्याचा करार – बंगालचा उपसागर आणि मलाक्का सामुद्रधुनी प्रदेशात अमेरिकेची लष्करी उपस्थिती वाढवण्यासाठी, तसेच सागरी निगराणी आणि सामरिक सहकार्य मजबूत करण्यासाठी एक करार झाला आहे.

मलाक्का ही चीनसाठी एक मोठी कमजोरी  

मलाक्काला जागतिक व्यापाराची जीवनरेखा म्हटले जाऊ शकते. मोठ्या प्रमाणात तेल, इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि इतर वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक होते. मलाक्का ही चीनसाठी एक मोठी सामरिक कमजोरी मानली जाते. चीनची सुमारे 80 टक्के तेल आयात याच मार्गाने होते. औद्योगिक अर्थव्यवस्था आणि निर्यात प्रणालीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे, चीनने त्यावरचे आपले अवलंबित्व ही एक कमजोरी मानली आहे. म्हणूनच चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांनी याला ‘मलाक्का पेचप्रसंग’ म्हटले होते. अलीकडे, चीनने या परिसराभोवती सागरी नकाशांकन आणि निगराणीच्या कारवाया वाढवल्या आहेत.

भारतासाठी मलाक्का महत्त्वाचे का आहे?

मलाक्का सामुद्रधुनी भारतासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. देशाचा सुमारे 55 टक्के व्यापार या मार्गातून आणि सिंगापूर प्रदेशातून होतो. भारताच्या भौगोलिक स्थानामुळे त्याला या क्षेत्रात सामरिक फायदा मिळतो. अंदमान आणि निकोबार बेटे सामुद्रधुनीच्या पश्चिम मुखाजवळ आहेत, जिथे पोर्ट ब्लेअरहून 24 तासांत पोहोचता येते. कॅम्पबेल बे येथे असलेले भारताचे आयएनएस बाझ हवाई तळ या परिसरावर निगराणी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे भारताला सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची शक्ती मिळते.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *