अखेर निर्णय झाला, तृणमूलच्या विलीनीकरणावर मोठी माहिती समोर; काँग्रेसने सस्पेन्स संपवला! – Marathi News | No merger of tmc and congress k c venugopal given clarification after delhi congress meeting


trinamool congress and congress and rahul gandhi and mamata banerjeeImage Credit source: tv9 marathi

TMC Merger In Congress : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या खळबळ उडालेली आहे. येथे कधीकाळी सत्तेत असणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूलमध्ये एकूण 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी बंड केले आहे. दुसरीकडे एकूण 20 खासदारदेखील नवा गट स्थापन करण्याच्या विचारात आहेत. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची शकलं होण्याची दाट शक्यता असल्याने आता कधी काय होणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. ममता बॅनर्जी यांनी अलिकडेच काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्त्वाची भेट घेतली होती. या भेटीनंतर तृणमूल काँग्रेस या पक्षाचे काँग्रेसमध्ये लवकरच विलीनीकरण होऊ शकते, असा अंदाज लावला जात होता. आता यावरच मोठी माहिती समोर आली आहे. काँग्रेसने या विलीनीकरणाच्या चर्चेचा सस्पेन्स संपवला आहे.

के सी वेणुगोपाल यांनी दिली माहिती

दिल्लीमध्ये काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांदी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते अपस्थित होते. साधारण 3 तास ही बैठक चालल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा झाली का? असे विचारले जात होते. याविषयी काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांनी माहिती दिली आहे. या बैठकीत नेमकं काय झालं याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

तृणमूल काँग्रेसचे विलीनीकरण होणार का?

तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणाची फक्त अफवा आहे. विलीनीकरणाच्या चर्चांना कोणताही आधार नाही, असे वेणुगोपाल म्हणाले. तसेच आजच्या बैठकीत इंडिया आघाडीला मजबूत कसे करता येईल, याविषयी चर्चा झाली, असेही वेणुगोपाल यांनी सांगितले. ममता बॅनर्जी, तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी नुकतेच राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. परंतु या बैठकीत सामान्य विषयांवर चर्चा झाली, असेही वेणुगोपाल यांनी सांगितले.

दरम्यान, आता वेणुगोपाल यांनी तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणाची शक्यता सध्यातरी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *