Weekly Horoscope 20 To 26 July 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिना हा अनेकांचे नशीब पालटणार आहे. जुलैचा चौथा आठवडा लवकरच सुरु होत आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. या नव्या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. त्यामुळे हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी मेष ते कन्या अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमच्या ध्येयावर तुमचं पूर्ण लक्ष असेल. तसेच, तुमच्या कामातून तुम्हाला चांगलं समाधान मिळेल. इतरांच्या मदतीस तुम्ही याल. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. जोडीदाराची चांगली साथ लाभेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलैचा चौथा आठवडा संधीचा असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक संधी मिळतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये देखील चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसून येतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. अनेक नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा सावधानतेचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या कामाबरोबरच घरातही लक्ष देण्याची गरज आहे. नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिकल गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या रागावरही नियंत्रण ठेवा. तुमच्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी 20 ते 26 जुलै या आठवड्याची सुरुवात फार दमदार असणार आहे. सुरुवातीला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मात्र, हळुहळू तुम्हाला पराभवाचा सामना देखील करावा लागू शकतो. घरातील सुख-सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नका. तो तुम्हाला महागात पडू शकतो.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी जुलैचा चौथा आठवडा प्रगतीचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट झालेली दिसेल. नवीन गोष्टींचं तुम्ही नियोजन कराल. तसेच, विनाकारण पैसे खर्च करणार नाही. करिअरच्या बाबतीत तुम्ही फार गंभीरतेने विचार कराल. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला या काळात करता येतील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्या हातून काही सकारात्मक गोष्टी घडतील. तुमची संवादशैली फार चांगली असणार आहे. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीला यश आलेलंही दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Horoscope Today 17 July 2026 : आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी संकटाचा; भूतकाळाचं सत्य समोर येणार, चोरी पकडण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य