Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने का निवडली 3 या क्रमांकाची जर्सी? ते गुपीत अखेर फुटलंच… कुणी दिला नंबर बदलण्याचा कानमंत्र – Marathi News | Why did Vaibhav Suryavanshi refuse the jersey number 12 before India vs Ireland T20 the secret finally came out Vaibhav Mother Aarti Suryavanshi whispered to him to change the jersey


Vaibhav Suryavanshi: टीम इंडियासोबत खेळण्याचे वैभव सूर्यवंशीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारत आणि आर्यलँड यांच्या दरम्यान 26 जूनपासून 2 सामन्यांची टी20 मालिका होत आहे. वैभव याला टीम इंडियाकडून सरप्राईज मिळाले आहे. त्याला भारतीय संघाची जर्सी मिळाली आहे. यासंबंधीचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण वैभव सूर्यवंशी याला 12 क्रमांकाची जर्सी मिळणार होती. तो क्रमांक बदलून त्याला 3 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. कोणी दिला त्याला जर्सीचा क्रमांक बदलण्याचा सल्ला?

3 या नंबरची जर्सी घालून मैदानात धमाका

BCCI ने वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये टीम इंडियाचे सपोर्ट स्टाफचे सदस्य रघू हे हॉटेलच्या रुममध्ये वैभव सूर्यवंशी याला भारतीय जर्सी देण्यासाठी जातात. जसा वैभव बॉक्स उघडतो. त्याचा आनंद दुप्पट होतो. त्यानंतर तो जर्सी मागून आणि पुढून पाहतो. त्यावेळी त्याला 3 या नंबरची जर्सी देण्यात आल्याचा खुलासा करण्यात येतो. भारतीय दमदार खेळाडू सुरेश रैना, हरभजन सिंह आणि युजवेंद्र चहल यांच्या जर्सीचाही हाच क्रमांक होता.

12 क्रमांक नाकारून का निवडला 3 क्रमांक?

जेव्हा वैभव सूर्यवंशीने त्याच्या व्यावसायिक क्रिकेट जीवनाची सुरुवात केली. तेव्हा त्याने 12 क्रमांकाची जर्सी घातली. पण त्याच्या आईने त्याला हा क्रमांक बदलण्याचा सल्ला दिला. 12 अंकातील दोन अंक (1 + 2) जोडून एकूण 3 हा क्रमांक येतो. मग 12 या क्रमांकापेक्षा थेट 3 हा अंक निवडणे काय चुकीचे आहे, असा मंत्र त्याच्या आईने दिला. वैभवने आईचा सल्ला ऐकला.

जर्सी भेटल्यानंतर काय म्हणाला वैभव?

टीम इंडियाची जर्सी मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशीचा आनंद दुप्पट झाला. तो म्हणाला, “हे एखाद्या स्वप्नासारखे आहे. ज्या उद्देशासाठी मी बॅट हाती घेतली आणि मैदानावर उतरलो. ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मी हा आनंद आज शब्दात मांडू शकत नाही. हे सर्व स्वप्नवत वाटत आहे. ही बाब मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. कधी कधी तुम्ही जे विचार करता, ते तुम्हाला मिळते. माझ्यासोबत सुद्धा असेच काहीसे झाले आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *