Actress Sanchita Ugale Death Case: हिंदी मनोरंजनसृष्टीत गाजलेली कुमकुम भाग्य मालिका तसेच छावा सारख्या लोकप्रिय चित्रपरांमध्ये दिसलेली अभिनेत्री संचिता उगले हिनं नालासोपारा येथील तिच्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. अभिनेत्रीच्या मचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली. अभिनेत्री संचिता उगले गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होती. तिला अनेकदा आत्महत्येचे विचार मनात डोकावायचे, असं तिची सहकलाकार मैत्रिण मेघा शर्माने सांगितलेलं. पण आता संचिताच्या निधनानंतर तिच्या मावशीने आणि वडिलांनी सिनेसृष्टीतील काही जणांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. इंडस्ट्रीतील काही लोकांकडून तिला मानसिक त्रास दिला जायचा, टॉर्चर केलं जायचं असा आरोप अभिनेत्रीच्या मावशीने केलाय. तिच्या वडिलांनीही संचिता पैशांच्या व्यवहारामुळे नैराश्यात गेल्याचं सांगितलं. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
संचिता उगलेच्या मावशीचे गंभीर आरोप
संचिताच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांसह सगळ्यांनाच धक्का बसलाय. संचिताने घरी कोणी नसताना साडीच्या सहाय्याने पंख्याला लटकून स्वतःला संपवलं. गेल्या दोन- चार महिन्यांपासून संचिता अत्यंत टेन्शनमध्ये होती. तिला इंडस्ट्रीतील काही लोकांकडून सतत मानसिक त्रास दिला जायचा. टॉर्चर केलं जायचं. असा दावा संचिताच्या मावशीनं केलं. जर तिने हा त्रास आधीच सांगितला असता तर, आम्ही वेळीच पाऊल उचलले असते. असेही त्या म्हणाल्या. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संचिताच्या वडिलांचेही गंभीर आरोप
दुसरीकडे, संचिताचे वडील आपल्या मुलीच्या आठवणीने प्रचंड दुःखी झाले आहेत. संचिता आनंदी स्वभावाची होती,मात्र अचानक ती नैराश्यात जाऊ लागली. हे लक्षात आल्यानंतर संचिताचे वडील तिच्यासोबत दररोज प्रवासात सोबत जाऊ लागले. कामाच्या ठिकाणी पैशांच्या व्यवहारावरून आणि अन्य काही कारणांमुळे तिला मानसिक दबाव होता. तिला हॅरॅसमेंटचाही त्रास दिला जायचा. माझ्या मुलीला काय त्रास होत आहे जगासमोर आले पाहिजे. केवळ माझ्याच नाही तर इतर सर्वच मुलींना न्याय मिळाला पाहिजे .. अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली. दरम्यान, अनेक सहकलाकारांनी संचिताच्या आत्महत्येनंतर प्रतिक्रिया देत, संचिता ही अत्यंत खंबीर आणि सकारात्मक विचारांची मुलगी असल्याचं सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगले आपले आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपाऱ्यातील परिसरात राहत होती. घरी एकटी असतानाच संचितानं टोकाचं पाऊल उचललं. संचितानं राहत्या घरात साडीच्या सहाय्यानं पंख्याला लटकून गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष