शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?


अहिल्यानगर : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डी (Shirdi) साईबाबा ट्रस्टच्या वार्षित उत्पन्नात यंदाच्या वर्षी घट झाल्याचं दिसून आलं. शिर्डीत दरवर्षी लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात. विदेशातील भाविकही साईबाबांचे (Saibaba) दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल होतात. यावेळी, साईनगरीत आलेल्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दानपेटीत दान टाकलं जातं, अनेक भाविक सोनं-चांदी (Gold) आणि मौल्यवान वस्तूंच्या स्वरुपात शिर्डी साईबाबा संस्थानकडे वस्तू देऊन आपली इच्छापूर्ती करतात. आता, संस्थानच्या गतवर्षीच्या वार्षिक उत्पन्नाचा लेखोजोखा समोर आला असून 2024-25 च्या तुलनेत यंदा काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं.  

शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या 2025-26 आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून मागील वर्षाच्या तुलनेत संस्थानच्या एकूण उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, मागील आर्थिक वर्षात पंधरा कोटींचे वस्तुरुपात अतिरिक्त दान प्राप्त झाल्याने दान अधिक असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नात तब्बल 14 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक लेखाजोखातील आकडेवारीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षात साईबाबा संस्थानचे एकूण उत्पन्न 648 कोटी रुपये होते. तर 2025-26 मध्ये हे उत्पन्न 638 कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच उत्पन्नात सुमारे 10 कोटी रुपयांची घट नोंदविण्यात आल्याचे दिसून येते. मात्र, साईबाबा संस्थानला वस्तू स्वरुपात 15 कोटींचे देखील अतिरिक्त दान भक्तांकडून प्राप्त झाल्याची माहिती संस्थानाकडून देण्यात आली. त्यामुळे, वस्तुस्वरुपातील दान ग्राह्य धरल्यास गतवर्षीच्या तुलनेत अधिकच दान झाल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 

शिर्डी साईबाबांच्या चरणी भाविकांनी वाहिलेल्या मौल्यवान वस्तूंपैकी सोने-चांदीच्या स्वरूपातील देणगीत मात्र मोठी वाढ झाली आहे. सन 2024-25 मध्ये 13 कोटी 95 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. ती यंदाच्या म्हणजेच 2025-26 मध्ये वाढून 19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 

शिर्डी साईबाबा संस्थानचे एकूण उत्पन्न – 

सन 2024-2025 मध्ये 648 कोटी
सन 2025-2026 मध्ये 638 कोटी

सोने-चांदी दान  

2024 – 2025 – मध्ये 13 कोटी 95 लाख रुपये
2025 – 2026 – मध्ये 19 कोटी 
( सोळा किलो सोने, 197 किलो चांदी )

दरम्यान, या व्यतिरिक्त हॉस्पिटल व इतर इमारतीसाठी 15 कोटींचे वस्तुरुपात दान देण्यात आले आहे.  

संस्थांनकडे एकूण ठेवी, एकूण सोनं-चांदी

एकूण ठेवी – 3,603 कोटी रुपये
एकूण सोने – 550 किलो
एकूण चांदी – 7030 किलो

हेही वाचा

मोठ्या संघर्षानंतर ‘एका’ राशीची अखेर सुटका! साडेसातीचा शेवटचा टप्पा, शनिदेव-दत्तगुरूंचं डबल पाठबळ, नोकरी, संपत्ती, प्रेमात ‘असे’ बदल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *