Thane Corporation Action : ठाण्यात शाळा, धार्मिक स्थळांच्या आजुबाजूच्या अनधिकृत चायनिज स्टॉल्स, चिकन-मटणाच्या दुकानावर धडक कारवाईचे आदेश


Thane Municipal Corporation : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील 500 मीटर अंतरावर असलेल्या अनधिकृत चायनीज, शावरमा स्टॉल्स, चिकन-मटण दुकाने तसेच पानटपऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी ठाणे महापालिकेच्या महासभेत करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मांडलेल्या या मागणीचे सभागृहातील सर्व सदस्यांनी जोरदार स्वागत केले. यावर सकारात्मक निर्णय घेत महापौर आणि महापालिका आयुक्तांनी मंगळवारपासूनच संपूर्ण शहरात धडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत.

शैक्षणिक संस्थांचे पावित्र्य राखणे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Mumbra Unauthorized Stalls Action : मुंब्र्यातही कठोर कारवाईची मागणी

दरम्यान, या मोहिमेची व्याप्ती फक्त विशिष्ट भागापुरती मर्यादित न ठेवता मुंब्र्यामध्येही अशा सर्व अनधिकृत गाड्या आणि दुकानांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते तथा स्थानिक नगरसेवक शानू अशरफ पठाण यांनी महासभेत केली. त्यामुळे ही धडक मोहीम संपूर्ण ठाणे पालिकेच्या हद्दीत व्यापक स्वरूपात राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Thane Pan Shop Encroachment : पानटपऱ्यांऐवजी फुल, फळ विक्रेत्यांना संधी द्या

महापौर आणि आयुक्तांच्या या आदेशानंतर उद्यापासून ठाणे पालिका क्षेत्रातील शाळा आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर पालिका प्रशासन कारवाई करणार आहे. यासोबतच, त्या रिकाम्या झालेल्या जागेवर फुल विक्रेते, फळ विक्रेते किंवा पुस्तकांची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी महासभेत केली आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *