SRH vs RR Eliminator : राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक, हैदराबाद 47 धावांच्या पराभवासह आऊट – Marathi News | Ipl 2026 srh vs rr eliminator rajasthan royals won and enter qualifier 2 beat sunrisers hyderabad by 47 runs vaibhav sooryavanshi shine


राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील क्वालिफायर 2 मध्ये धडक देत ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशी याने केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. राजस्थानने हैदराबादला 19.2 ओव्हरमध्ये 196 रन्सवर ऑलआऊट केलं. राजस्थानने यासह क्वालिफायर 2 चं तिकीट मिळवलं. तर हैदराबादचं पराभवासह पॅकअप झालं.

राजस्थानकडून विजयासह पराभवाची मालिका खंडीत

राजस्थान रॉयल्सने हैदराबादला पराभूत करुन मोठा कारनामा केला आहे. राजस्थानने हैदराबाद विरुद्ध पराभवाची मालिका खंडीत केली आहे. हैदराबादने याआधी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सलग 6 सामने जिंकले होते. मात्र राजस्थानने एकाच विजयासह पराभवाची मालिका खंडीत केली आणि हैदराबादला 19 व्या मोसमातून बाहेरचा रस्ता दाखवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *