Shivangi Verma Mother Passed Away Emotional Post: टीव्ही विश्वापासून ओटीटीपर्यंत, आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शिवांगी वर्मावर (Shivangi Verma) दुखा:चा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं आहे. याची माहिती अभिनेत्रीच्या टीमने सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन दिली आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्रीला प्रचंड दु:ख झाले आहे. सध्या अभिनेत्रीच्या पोस्टवर कलाकार तसेच चाहत्यांनी कमेंट करुन दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवांगी वर्मावर दु:खाचा डोंगर (TV actress Shivangi Verma family tragedy)
शिवांगी वर्मा या अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत ‘भूटू’, ‘हमारी सिस्टर दीदी’ आणि ‘हसरते 3’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकांमुळे अभिनेत्रीला विशेष प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, अभिनेत्री सध्या अशा दु:खद घटनेला सामोरे जात आहे, ज्यामुळे ती पूर्णपणे खचून गेली आहे. आईला आपल्या आयुष्यातून गमावणे ही कुणाच्याही आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका असते, आणि शिवांगी सध्या याच वेदनेतून जात आहे.
अभिनेत्रीच्या आईनं निधन, चाहत्यांकडून पाठिंबा (Shivangi Verma takes break after mother death)
शिवांगी वर्माच्या टीमने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी माहिती शेअर केली. टीमने पोस्टमध्ये म्हटलं की, ‘आईच्या निधनामुळे झालेल्या तीव्र दु:खामुळे शिवांगी सध्या अॅक्टिव्ह नाही आहे’. अभिनेत्रीच्या टीमने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘हा काळ अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबासाठी खूप कठीण काळ आहे. त्यांना प्रेम, प्रार्थना आणि सपोर्टची गरज आहे. शिवांगी परत लवकरच सक्रीय होईल. पण तिला थोडा वेळ आणि एकांत हवा आहे. या कठीण काळात अभिनेत्रीला सपोर्टची गरज आहे. तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी’.
अभिनेत्रीच्या टीमने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करुन शोक व्यक्त केला आहे. तसेच काहींनी कमेंट करुन अभिनेत्रीच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. तर, काही चाहत्यांनी शिवांगी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान, मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आणि चाहते या दु:खाच्या काळात अभिनेत्रीच्या पाठीशी उभे आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत
आणखी वाचा