Prashan Kishor Wife : बांकीपूरमध्ये दणदणीत यश, प्रशांत किशोर यांच्या विजयामागचं ‘लेडी लक’ कोण? जाणून घ्या पत्नी जाह्नवी दास यांची कहाणी – Marathi News | Who is Janhvi Das? Meet Prashant Kishor’s Doctor Wife and Her Role in PK’s Success


कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी जाह्नवी दास?

बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. तिथे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाचे नीरज कुमार यांना, प्रशांत किशोर यांनी 19 हजार 324 मतांनी हरवलं. या निवडणुकीमुळे रणनीतिकार असलेले प्रशांत किशोर हे पुन्हा चर्चेत आले असून, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दही चर्चा सुरू झाली आहे. प्रशांत किशोर यांचं आयुष्य, त्याचं जीवन, विशेषत: त्यांची पत्नी जान्हवी दास, यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. 25 ऑगस्ट 2024 रोजी सार्वजनिक मंचावरून प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच पत्नीचा उल्लेख केला होता. त्या कोण, काय करतात, हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.

तर पटना येथील बापू सभागृहात आयोजित ‘जन सुराज महिला संवाद’ कार्यक्रमात देखील प्रशांत किशोर यांनी पत्नी जाह्नवी दास यांची उपस्थितांना ओळख करून दिली होती. मी बिहारमध्ये पूर्ण क्षमतेने काम करू शकत आहे, त्यामागे पत्नीचे मोठं योगदान आहे, असं ते यावेळी म्हणाले होते. “तुमचा हा भाऊ आज इतक्या ताकदीने काम करू शकतो, कारण घर आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एका महिलेने आपल्या खांद्यावर घेतली आहे” असं म्हणत प्रशांत किशोर यांनी त्यांच्या पत्नीची स्तुति केली होती.

कोण आहेत जान्हवी दास ?

प्रशांत किशोर यांची पत्नी, जाह्नवी दास या मूळच्या आसाममधील असून त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) हेल्थ प्रोग्राममध्ये काम करत असताना त्यांची आणि प्रशांत किशोर यांची पहिल्यांदा ओळख झाली. एकत्र काम करताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. बराच काळ ते एकत्र होते, नंतर त्यांनी लग्न केलं. प्रशांत किशोर आणि जान्हवी या जोडप्याला एक मुलगाही आहे.

डॉक्टरकी सोडून स्वीकारली कुटुंबाची जबाबदारी

प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला सामाजिक आणि राजकीय कार्याला पूर्ण वेळ देता यावा, यासाठी जाह्नवी दास यांनी आपले वैद्यकीय करिअर सोडून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. पत्नीच्या पाठिंब्यामुळेच ते बिहारच्या राजकारणात आणि ‘जन सुराज’ अभियानात पूर्णवेळ कार्यरत राहू शकले, असंही त्यांनी या कार्यक्रमादरम्यान नमूद केलं. सध्या जाह्नवी दास या पती आणि मुलासोबत बिहारमध्ये राहतात. मात्र, राजकीय कार्यक्रमांपासून आणि सार्वजनिक व्यासपीठांपासून बहुतांश वेळा त्या दूरच राहणं पसंत करतात.

पोटनिवडणुकीतील विजयानंतर पुन्हा चर्चेत

बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर सोशल मीडियावर प्रशांत किशोर यांच्या राजकीय रणनीतीची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर त्यांच्या यशामागे पत्नी जाह्नवी दास यांचे योगदानही अनेकांकडून अधोरेखित केलं जात आहे. सार्वजनिक व्यासपीठावर प्रशांत किशोर यांनी पत्नीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *