NCP Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसचा बोचरा वार, राष्ट्रवादीनं थेट इंदिरा गांधींच नाव घेतलं, ”महिला नेतृत्वावर…” | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

NCP Sunetra Pawar: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रसने बोचरी टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीने थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव घेत काँग्रेसवर हल्ला चढवला.

सुनेत्रा पवारांवर काँग्रेसचा बोचरा वार, राष्ट्रवादीनं थेट इंदिरा गांधींच नाव घेतलं, ''महिला नेतृत्वावर...''
सुनेत्रा पवारांवर काँग्रेसचा बोचरा वार, राष्ट्रवादीनं थेट इंदिरा गांधींच नाव घेतलं, ”महिला नेतृत्वावर…”

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोरदार वाद रंगण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रसने बोचरी टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीने थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव घेत काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर टीका करताना त्यांना गुंगी गुडिया असे संबोधले. काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर ही पोस्ट केल्यानंतर वादाची ठिणगी पडली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही दिवसापूर्वीच बीडच्या दौऱ्यावर होत्या. सुनेत्रा पवार या बीडच्या पालकमंत्रीदेखील आहेत. प्रशासकीय बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारला. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी उत्तर देण्याचे टाळले. तर, राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत पत्रकार परिषद संपवली. याच पत्रकार परिषदेचा संदर्भ देत ‘गुंगी गुडिया’ अशी बोचरी टीका केली. काँग्रेसने सुनेत्रा पवार या भूमिकेशिवाय आणि मुकपणे किती दिवस राहणार, असा सवाल केला. सोबत काँग्रेसने व्हिडीओही ट्वीट केला.

राष्ट्रवादीचा पलटवार…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पवार यांनी म्हटले की, ‘गुंगी गुढिया’ हा शब्दप्रयोग प्रथमच ऐकायला मिळालेला नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावर अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती. मात्र इंदिरा गांधी यांनी कोणालाही शब्दांनी नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिले. आज प्रश्न असा निर्माण होतो की, ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळात अन्यायकारक व महिलेचा अवमान करणारी टीका मानले होते, त्याच शब्दप्रयोगाचा वापर आज काँग्रेस स्वतः एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध का करत आहे? असा सवाल त्यांनी केला.

इंदिरा गांधी यांच्यावरील त्या काळातील टीका योग्य होती हे काँग्रेस आज अप्रत्यक्षपणे मान्य करत आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला. हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नाही; तर सार्वजनिक जीवनातील महिलांविषयीच्या राजकीय संस्कृतीचा असल्याचे पाटील यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसने संबंधित शब्दप्रयोग मागे घ्यावा आणि सार्वजनिक जीवनात सन्मानपूर्वक राजकीय संवादाची परंपरा जपावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

NCP Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसचा बोचरा वार, राष्ट्रवादीनं थेट इंदिरा गांधींच नाव घेतलं, ”महिला नेतृत्वावर…”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *