Omraje Nimbalkar: सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा गेम फसणार? ऑपरेशन टायगर धोक्यात? ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा झटका – Marathi News | Mp omraje nimbalkar breaks silence on shinde sena entry says no final decision yet 2


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हीप जारी करुन तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील 6 खासदारांनी दांडी मारली. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालानंतर मोठा ट्विस्ट आला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठे विधान केले आहे.

तब्बल दोन दशकानंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज कोर्टाने दिला आहे. सबळ पुराव्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही असं कोर्टाने म्हटलं. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्क बसला आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय समीकरणे फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पवनराजे निंबाळकर केसच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. याबाबत ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सेनेत जाण्याचा अद्याप कोणता राजकीय निर्णय घेतलेला नाही. मतदार संघात जाऊन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेणार असल्याचे ओमराजे यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *