Neet Paper Leak case : प्रा.मनिषा हवालदार हीने रोख रक्कम स्वीकारली, सीबीआयचा कोर्टात आरोप – Marathi News | NEET Paper Leak Case: Prof. Manisha Havaldar accepted cash, CBI alleges in court


नीट पेपर फुट प्रकरणात कालच सीबीआयने फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका मनिषा हवालदार यांना पुण्यातून अटक केली होती. मनिषा हवालदार हीने एनटीएमधील सूत्रांच्या माध्यमातून फिजिक्सचे प्रश्न मिळवले होते असे उघडकीस आले आहे. तसेच तिने विद्यार्थ्यांकडून प्रश्नांच्या बदल्यात रोख रक्कम स्वीकारल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे या केसमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे कॅश स्वीकारल्याचे पुढे आले असल्याचे म्हटले जात आहे. या नीट पेपर फुट घोटाळ्याचा तपास सीबीआय करत असून देशभरातून आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

देशभरात गाजत असलेल्या NEET-UG 2026 च्या परीक्षा पेपर फुट प्रकरणात पुण्यातून सीबीआयने (CBI ) मनीषा संजय हवालदार ( मुख्याध्यापिका, सेठ हिरालाल सराफ प्रशाला ) यांना अटक केली आहे. मनिषा यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतील (NTA) सूत्रांकडून भौतिकशास्त्राचा ( Physics ) पेपर लीक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मनिषा हवालदार यांनी इच्छुक विद्यार्थ्यांकडून फिजिक्सच्या पेपरच्या प्रश्नांच्या बदल्यात थेट रोख रक्कम स्वीकारल्याचे सीबीआयने ट्राझिंस्ट रिमांडसाठी सादर करताना कोर्टात सांगितले आहे. मनिषा हवालदार यांना २५ तारखेला कोर्टात सादर केले जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका मनिषा हवालदार यांना काल सीबीआयने अटक केली होती. काल रात्री जेव्हा मनिषा हवालदार यांना कोर्टात सादर करण्यात आले. ट्रान्झिस्ट रिमांडसाठी त्यांना कोर्टात सादर केले गेले तेव्हा सीबीआयकडून कोर्टात मोठा दावा केला गेला. सीबीआयने म्हटले आहे की आमच्या तपासात स्पष्टपणे उघड झाले आहे की ज्या पद्धतीने मनिषा हवालदार हीने प्रश्न पुरवले होते. त्या बदल्यात मनिषा हवालदार हीने विद्यार्थ्यांकडून रोख रक्कम स्वीकारलेली होती. आतापर्यंत जेवढे आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांच्यातील कोणी थेट रोख रक्कम स्वीकारल्याचे उघड झालेले नाही. मात्र, मनिषा हवालदारने रोख रक्कम स्वीकारलेली आहे.

विशेष सीबीआय न्यायालयात सादर केले जाणार

मनिषा हवालदार हीने काही प्रश्न नोट्समध्ये लिहिलेले होते. ते प्रश्न तिने व्हॉट्सअपने पुरवले होते. मनिषा हवालदारला दोन दिवसांचा ट्रान्झिस्ट रिमांड दिलेला आहे. आता तिला दोन दिवसानंतर २५ तारखेला दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात सादर केले जाणार आहे. एनटीएमधील काही अधिकृत लोक होते.त्यांच्या मदतीने मनिषा हवालदारने प्रश्न फोडले असू शकतात असा सीबीआयला अंदाज आहे. त्याचा सीबीआय तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *