Krushi Market Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, लिंबूचेही भाव नरमले, आंब्याची काय स्थिती? इथं चेक करा | शेती बातम्या


Last Updated:

कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने दरांवर दबाव कायम राहिला, तर लिंबाच्या बाजारातही भाव काहीसे नरमले. दुसरीकडे हंगामाच्या अखेरीस हापूस आंब्याला चांगली मागणी मिळाल्याने त्याच्या दरात वाढ नोंदविण्यात आली.

+

News18

News18

अमरावती : राज्यातील कृषी बाजारपेठांमध्ये शुक्रवारी संमिश्र चित्र पाहायला मिळाले. कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने दरांवर दबाव कायम राहिला, तर लिंबाच्या बाजारातही भाव काहीसे नरमले. दुसरीकडे हंगामाच्या अखेरीस हापूस आंब्याला चांगली मागणी मिळाल्याने त्याच्या दरात वाढ नोंदविण्यात आली.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांद्याची आवक दोन लाख क्विंटलच्या पुढे राहिली. एकूण 2 लाख 7 हजार 588 क्विंटल कांदा विविध बाजारांमध्ये दाखल झाला. नाशिक बाजारपेठेत सर्वाधिक 1 लाख 22 हजार 841 क्विंटल कांद्याची नोंद झाली. मोठ्या आवकेमुळे नाशिकमध्ये कांद्याला 392 ते 1 हजार 720 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. सोलापूर बाजारात लाल कांद्याने मात्र चांगला भाव मिळवत 2 हजार 600 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला. गुरुवारच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात काहीशी घसरण दिसून आली.

लिंबाच्या बाजारात आवक मर्यादित राहिली. राज्यभरातून केवळ 879 क्विंटल लिंबू बाजारात दाखल झाले. पुणे बाजारात सर्वाधिक 455 क्विंटल लिंबाची आवक झाली. तेथे लिंबाला 3 हजार 700 ते 5 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जळगाव बाजारात लिंबाच्या दराने सर्वाधिक 7 हजार रुपये प्रति क्विंटलचा स्तर गाठला. मात्र एकूणच बाजारातील व्यवहारांमध्ये भाव नरमल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, आंब्याच्या बाजारात चांगली हालचाल कायम आहे. राज्यभरातून 13 हजार 610 क्विंटल आंब्यांची आवक झाली असून मुंबई बाजारात सर्वाधिक 11 हजार 241 क्विंटल आंबा दाखल झाला. या बाजारात आंब्याला 6 हजार ते 20 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. विशेष म्हणजे हापूस आंब्याला ग्राहकांकडून चांगली मागणी मिळाल्याने त्याचा उच्चांकी दर 30 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. गुरुवारच्या तुलनेत हापूसच्या दरात तेजी नोंदविण्यात आली.

मराठी बातम्या/कृषी/

Krushi Market Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, लिंबूचेही भाव नरमले, आंब्याची काय स्थिती? इथं चेक करा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *