Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्….; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!


Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वडगाव येथे एक अतिशय धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर दारू (Jalgaon Crime News) ओतून चक्क पेटवून ठार मारण्याचा (Crime News) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी पती राजू किशोर तडवी याला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Jalgaon Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, राजू तडवी याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या अंगावर दारू ओतून पेटती काडी फेकल्याने महिलेच्या कपड्यांनी पेट घेतला. आरडाओरड ऐकून नागरिकांनी धाव घेत आग विझवली आणि महिलेला उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News : शिक्षण मंदिरात धक्कादायक प्रकार..! प्राचार्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या शिक्षण संस्थेतच एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने प्राचार्यावर लैंगिक छळ, अश्लील वर्तन आणि विनयभंगाचे गंभीर आरोप केल्याने नालासोपारा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी संबंधित ज्युनिअर अँड डिग्री कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. त्याचबरोबर शिक्षणाचा खर्च स्वयंम उचळण्यासाठी त्याच कॅालेजमध्ये पार्ट टाइम काम ही करत होती. तक्रारीनुसार, प्राचार्य वारंवार तिला केबिनमध्ये बोलावून शरीरयष्टीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत होते. तिचा फोटो काढणे, विनापरवानगी चुंबन घेणे, तसेच अयोग्य स्पर्श केल्याचाही आरोप तिने केला आहे. तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने रात्री उशिरा सोबत येण्यासाठी दबाव टाकण्यात आला. न आल्यास घरच्यांकडे बदनामी करण्याची धमकी देण्यात आली, तसेच एका हॉटेलमध्ये रात्री थांबण्याचा प्रस्तावही दिल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने विद्यार्थिनीने अखेर पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी BNS कलम 74, 79 तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा पुढील तपास आचोळे पोलीस करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *