10 दिवसांपूर्वी झालेलं लग्न, दोघांच्या वयात होतं 22 वर्षांचं अंतर, मध्यरात्री नको ते घडलं त्यात पत्नीचा मृत्यू – Marathi News | Agreement marriage turn into death 23 years old sandhya get married with 45 years old mukesh kumar lohar


लग्न प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नाआधी प्रत्येक मुलगी सुखी संसाराचे स्वप्न पाहत असते, पण लग्नानंतर नेमकं काय होणार याबद्दल तिला देखील माहिती नसतं. आता एक मोठी दुर्घटना समोर येत आहे, जेथे 23 वर्षीय संध्याचं लग्नाच्या 10 दिवसांत निधन झालं आहे. अत्यंत भयानक अवस्थेत संध्या हिचा मृतदेह पोलिसांना आढळला. मध्यरात्री जवळपास 2 वाजता संध्या दोरीच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण पळण्याचा प्रयत्न करत असताना दोरी मध्येत तुटली आणि संध्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली जमिनीवर कोसळली… याप्रकरणी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत… ही धक्कादायक घटना मध्य प्रदेश येथील रतलाम जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय संध्या हिचं लग्न 10 दिवसांपूर्वी 45 वर्षी मुकेश कुमार लोहार याच्यासोबत झालेलं. पती मुकेश याच्या म्हणण्यानुसार, एक करारनामा आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा विवाह संपन्न झाला होता आणि त्यानंतर तो संध्याला त्याच्या घरी रतलामला घेऊन आला होता. 45 वर्षीय मुकेश कुमार लोहार आणि 23 वर्षीय संध्या यांच्या वयात 22 वर्षांतं अंतर होतं; त्यामुळे हा विवाह बळजबरीने किंवा दबावाखाली केला गेला असावा, अशी शंका याठिकाणी निर्माण होत आहे.

मध्यरात्री पत्नी अंथरुणावर आढळली नाही

29 आणि 30 जुलैच्या मध्यरात्री रात्री जेवल्यानंतर घरातील सर्व सदस्य झोपलेले. तेव्हा रात्री 2 मुकेश याला जाग आली, पण मध्यरात्री पत्नी अंथरुणावर आढळली नाही. संध्या हिला शोधलं असता, घराच्या मागे असलेल्या जागेत रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तेव्हा 112 च्या मदतीने संध्या हिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, संध्या हिला मृत घोषित केलं… ज्यामुळे खळबळ माजली…

तिसऱ्या मजल्यावरील ग्रीलला दोर बांधलेला आढळला; कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत अंत्यसंस्कार

पोलिसांनी सांगितल्यानुसार, तिसऱ्या मजल्यावरील ग्रीलला पोलिसांना दोर बांधलेला आढळला. तर अर्धा दोर संध्या हिच्या मृतदेहाजवळ आढळला… ज्यामुळे स्पष्ट होत आहे की, संध्या हिने घरातून पळण्याचा प्रयत्न केला. माणक चौक पोलिसांनी रोहतास येथील तिच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती दिली. 48 तासांच्या आत माहेरची मंडळी न आल्यामुळे, शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह पतीच्या ताब्यात देण्यात आला.

माणक चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विक्रम सिंग चौहान यांनी सांगितलं की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे; तसेच बिहार पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. घडलेल्या घडनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *