IND vs ENG : यास्तिकानंतर आता सुंदरही लकी… दोन्ही दिवस सेम टू सेम झालं, स्टंपला बॉल लागूनही दोघं नॉटआऊट! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेटने विजय झाला आहे. कर्णधार शुभमन गिल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

यास्तिकानंतर आता सुंदरही लकी... दोन्ही दिवस सेम टू सेम झालं, स्टंपला बॉल लागूनही दोघं नॉटआऊट!
यास्तिकानंतर आता सुंदरही लकी… दोन्ही दिवस सेम टू सेम झालं, स्टंपला बॉल लागूनही दोघं नॉटआऊट!

बर्मिंघम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेटने विजय झाला आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमध्ये भारताला एकही विजय मिळवता आला नाही, त्यानंतर अखेर भारतीय टीमला गुड न्यूज मिळाली आहे. इंग्लंडने दिलेल्या 259 रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 4 विकेट गमावून केला. कर्णधार शुभमन गिल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

शुभमन गिल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकं झळकावली. शुभमन गिलने 75 बॉलमध्ये 80 रन केले, पण पायाच्या दुखापतीमुळे गिल रिटायर्ड हर्ट झाला. तर अक्षर पटेलने नाबाद 57 आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 रनची खेळी केली.

वॉशिंग्टन सुंदरला मिळाली लाईफलाईन

या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला नशिबानेही साथ दिली. 39 व्या ओव्हरमध्ये विल जॅक्सने टाकलेला बॉल सुंदरच्या पॅडला लागून स्टंपला लागला, पण बेल्स न पडल्यामुळे सुंदरला लाईफलाईन मिळाली. बॉल सुंदरच्या पॅडला लागल्यामुळे इंग्लंडने एलबीडब्ल्यूसाठी अपीलही केलं, पण अंपायरने नॉटआऊट दिलं, यानंतर इंग्लंडने डीआरएसही घेतला, पण बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिच झाल्यामुळे थर्ड अंपायरनेही सुंदरला नॉट आऊट दिलं. हे जीवनदान मिळालं तेव्हा सुंदर 28 रनवर खेळत होता.

यास्तिकासोबतही सेम घडलं

याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाची खेळाडू यास्तिका भाटियासोबतही असंच घडलं. या सामन्यात यास्तिका भाटियाने ऐतिहासिक शतक झळकावलं, पण 50 रनवर असताना यास्तिका वाचली होती. 43व्या ओव्हरमध्ये लॉरेनच्या बॉलिंगवर यास्तिकाच्या बॅटच्या एजला बॉल लागला आणि स्टंपवर गेला. बॉल स्टंपला लागला पण बेल्स न पडल्यामुळे यास्तिका नॉटआऊट राहिली आणि पुढे जाऊन तिने शतक झळकावलं. यास्तिकाच्या या शतकामुळे टीम इंडियाने लॉर्ड्सवर विजय मिळवून इतिहास घडवला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

IND vs ENG : यास्तिकानंतर आता सुंदरही लकी… दोन्ही दिवस सेम टू सेम झालं, स्टंपला बॉल लागूनही दोघं नॉटआऊट!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *