Hurun India Rich List 2026: ना सलमान, ना आमीर अन् ना अमिताभ बच्चन; ‘हा’ 60 वर्षांचा हँडसम हंक देशातला सर्वात श्रीमंत अभिनेता, नेटवर्थ 10 हजार कोटींच्या पार


Hurun India Rich List 2026: सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) उगाच नाही, बॉलिवूडचा (Bollywood News) किंग, बादशाह म्हणत. पुन्हा एकदा शाहरुख खान (King Khan) भारतातील श्रीमंत अभिनेता ठरलाय. ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026’ (Hurun India Rich List 2026) नुसार, शाहरुख खानचं नेट वर्थ सुमारे 10,000 कोटी रुपये इतकं आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच्या संपत्तीत सुमारे 2,490 कोटी रुपयांची घट झालीय. पण, तरीसुद्धा शाहरुखनं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. शाहरुखच्या संपत्तीत घट होऊनही बॉलिवूडचे बिग बी (Big B) आणि भाईजान यांना त्यानं संपत्तीच्या बाबतीत पछाडलं आहे.  

2025 च्या हुरुन यादीत त्याची संपत्ती 12,490 कोटी रुपये इतकी होती. शाहरुख खानची संपत्ती केवळ सिनेमांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून नाही, त्याच्या एकूण संपत्तीमध्ये बँक बॅलन्स, घरं आणि वाहनं, तसेच, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नाइट रायडर्स फ्रँचायझी संघांचाही समावेश आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ (Amitabh Bachchan Net Worth)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 4,000 कोटी रुपयांच्या अंदाजित संपत्तीसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. 2025 मध्ये त्यांची अंदाजित संपत्ती सुमारे 1,630 कोटी रुपये होती. अमिताभ बच्चन यांनी ‘फॅमिली ऑफिस’च्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांच्याकडे स्थावर मालमत्ताही आहे. या गुंतवणुकी आणि मालमत्तांचा त्यांच्या एकूण अंदाजित संपत्तीमध्ये समावेश होतो.

सलमान खानची ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये एन्ट्री (Salman Khan Net Worth)

सलमान खान या वर्षाच्या हरुनच्या लिस्टमध्ये नव्यानं सामिल झालाय. त्याची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे 3,000 कोटी रुपये इतकी आहे. सिनेमांमधून मिळणाऱ्या कमाईव्यतिरिक्त, विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून मिळणारं उत्पन्न त्याच्या संपत्तीत भर घालतं. त्याची दीर्घकालीन सिनेकारकीर्द आणि मजबूत ‘ब्रँड व्हॅल्यू’ हे त्याच्या एकूण संपत्तीतील महत्त्वाचे घटक आहेत. हृतिक रोशनचाही या यादीत समावेश असून त्याची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे 2,500 कोटी रुपये आहे. 2025 मध्ये त्याची संपत्ती सुमारे 2,160 कोटी रुपये इतकी होती. त्याच्या एकूण संपत्तीमध्ये त्याचा फिटनेस आणि लाइफस्टाइल ब्रँड HRX महत्त्वाची भूमिका बजावतो.

गेल्या वर्षी यादीत असलेली पण यावेळी वगळलेली प्रमुख नावं

2026 च्या ‘हुरुन’ यादीतून काही अशी नावे वगळण्यात आली आहेत जी गेल्या वर्षी यादीत होती. यावेळी जुही चावला आणि करण जोहर यांची नावे या यादीत नाहीत. 2025 मध्ये जुही चावलाची एकूण संपत्ती 7,790 कोटी रुपये, तर करण जोहरची संपत्ती सुमारे 1,880 कोटी रुपये इतकी असल्याचे मानले जात होते; मात्र, यावर्षी या दोघांपैकी कोणाचेही नाव यादीत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shah Rukh Khan Asked For Tilak In Ganpati Pandal: ‘टिळा कुठंय? मला कपाळावर लावायचाय…’, शाहरुख खानच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनं जिंकली मनं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *