Gold Silver Rates Today: जागतिक घडामोडींचा परिणाम सध्या सोने-चांदीच्या दरावर (Gold Silver Rates) होताना दिसतोय. पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठे अस्थिरता दिसून येण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील वाढलेला तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ आणि अमेरिकेच्या फेडरल रिजर्वच्या व्याजदर निर्णयामुळे सोने चांदीच्या बाजारावर दबाव वाढला आहे. याचा परिणाम भारतातील सोन्या-चांदीचा दरावर होतोय. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्या चांदीची खरेदी करण्याचा प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी, सोने खरेदीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. येत्या काही दिवसात सोन्या चांदीचे दर अस्थिर राहणार असल्याचा इशारा जगभरातील तज्ञ देत आहेत.
आजचे सोन्या-चांदीचे दर किती? (Gold Silver Rates)
बुलियन्स असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्यासाठी 30 जुलै रोजी ग्राहकांना 1 लाख 42 हजार 290 रुपये प्रति 10 ग्रॅम द्यावे लागतील. तर चांदीचा दर किलोमागे 2 लाख 16 हजार 50 रुपयांवर पोहोचलाय. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 30 हजार 433 रुपयांवर पोहोचला आहे. तर 18 कॅरेट सोने एक लाख सहा हजार 718 रुपयांवर आहे.
सोने चांदीच्या दरात अस्थिरता कशामुळे?
– मध्य पूर्वेतील इराण अमेरिका तणावामुळे जागतिक बाजारातील अनिश्चितता वाढली आहे.अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्या चांदीकडे वळतात.
-अमेरिकन डॉलरचा निर्देशांक एका महिन्याच्या उच्चांकावर पोहोचलाय. डॉलर मजबूत झाल्याने इतर देशांच्या चलनामध्ये सोने महाग होते. सोन्याची मागणी घटते आणि दरांवर दबाव येतो.
-जागतिक बाजाराचे, गुंतवणूकदारांचे सर्वाधिक लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्वच्या व्याजदरावर होते. हा दर अपेक्षेप्रमाणेच, 3.5% ते 3.75 % ठेवण्यात आला. हा व्याजदर वाढल्यास सोने-चांदीच्या व्याज न देणाऱ्या मालमत्तेची मागणी कमी होऊ शकते.
-कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.तेल महागल्याने महागाईची चिंता कायम आहे.महागाई वाढल्यास केंद्रीय बँका व्याजदर जास्त काळ उच्च पातळीवर ठेवू शकतात.याचा परिणाम सोन्यावर होतो.
खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या
सोने खरेदी करताना नेहमी BIS हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या आणि पक्के बिल नक्की घ्या.
चांदी खरेदी करताना तिची शुद्धता तपासण्यास विसरू नका.
वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थानिक कर (Local Taxes) आणि मेकिंग चार्जेसमुळे किमतींमध्ये थोडा फरक असू शकतो.