Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला 21 मोदकांचाच नैवेद्य का दाखवतात? हा अंक नेमका कुठून आला? वाचा 21 मोदकांमागची रंजक स्टोरी


Ganesh Chaturthi 2026 : सध्या सगळीकडे आपल्याला गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2026) धामधूम पाहायला मिळतेय. गणपतीच्या आगमनाने सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. या दरम्यान गणपतीच्या (Ganesh Chaturthi 2026) आख्यायिका, गणपतीशी संबंधित गोष्टी आपल्याला सतत कानावर पडत असतात. पण, काही गोष्टींची उत्सुकता मात्र अजूनही कायम आहे. अशातच गणपतीला आपण मोदकांचा नैवेद्य देतो हे आपल्याला माहीतच आहे. पण गणपतीला 21 मोदकांचाच नैवेद्य का देतात? आणि 21 दुर्वाच का वाहतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. 

गणपतीला 21 मोदकच का दाखवतात? हा अंक कुठून आला? 

गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य का अर्पण करतात या संदर्भात सांगताना पुरातत्वशास्त्रज्ञ वेदांग जोशी यांनी सोशल मीडियावर अशी माहिती सांगितली आहे की, 21 मध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचमहाभूत आणि एक मन यांचा समावेश आहे. यामध्ये जर अधिक विस्ताराने आपण पाहिलं तर,  

पाच ज्ञानेंद्रिय

पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे, नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यांच्या माध्यमातून आपण जगाशी संवाद साधतो. 

पाच कर्मेंद्रिय

पाच कर्मेंद्रिय म्हणजे, उपस्थ, पायू, पाय, हात आणि वाक् म्हणजे आपला साऊंड बॉक्स याने आपण सर्व प्रकारची कर्म करतो. 

पंचप्राण

पंचप्राण म्हणजे, राण, अपान, व्यान, उदान, समान हे पाच पंचप्राण आहे. यांचा उल्लेख आपण पूजेमध्ये नेहमी ऐकतो. 

पंचमहाभूत

पंचमहाभूत म्हणजे, पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश. या सगळ्यांवर अधिराज्य करणारं माझं मन. या सगळ्याचं प्रतीक म्हणजे 21 दुर्वा आम्ही देवाला अर्पण करतो. याचाच अर्थ अख्खं विश्व तुला अर्पण केलं देवा काय हवं अजून सांग. 

यासाठी गणपतीला नेहमी 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी 11 मोदक नैवेद्य म्हणून दाखवण्याची देखील परंपरा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                               

Budhaditya Rajyog 2026 : कन्या राशीत महाशक्तीशाली बुधादित्य राजयोग झाला एक्टिव्ह; 26 सप्टेंबरपर्यंत 3 राशींच्या धनसंपत्तीत होणार भरभराट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *