पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट


Prithvi Shaw : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ च्या (Prithvi Shaw) वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी, अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल (Akriti Agarwal )  यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यापूर्वीच या दोघांचा साखरपुडा झाला होता. आकृतीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. भिन्न उद्दिष्टे, जबाबदाऱ्या आणि भविष्यातील परिस्थितींमुळे त्यांनी वेगळे मार्ग निवडले आहेत. तसेच, त्यांच्या मनात अजूनही एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी असल्याची भावना व्यक्त करत, तिने सर्वांना त्यांच्या खाजगीपणाचा (प्रायव्हसीचा) आदर करण्याची विनंती केली आहे.

आकृती अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता. 8 मार्च 2026 रोजी या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर ते चाहत्यांचे आवडते जोडपे बनले, पण आता त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आकृती आणि पृथ्वी शॉ आता विभक्त झाले आहेत. स्वतः आकृतीनेच याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आपले दुःख व्यक्त केले. 

आकृती अग्रवालने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? 

आकृती अग्रवाल आणि पृथ्वी शॉ हे त्यांच्या विभक्त होण्यामुळे बऱ्याच काळापासून चर्चेत होते. बऱ्याच अटकळांनंतर, आकृतीने आता अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, जड अंतःकरणाने मला हे सांगायचे आहे की, मी आणि माझ्या होणाऱ्या पतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आमची ध्येये आणि भविष्यातील परिस्थिती वेगवेगळी आहे.

परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय

आकृतीने दिलेल्या माहितीनुसार, आमचे एकमेकांवर खूप प्रेम आणि काळजी असली तरी, आमच्या जबाबदाऱ्या आणि आम्ही ज्या परिस्थितीला सामोरे जात आहोत त्या वेगवेगळ्या आहेत हे आम्ही आता ओळखले आहे. आम्ही आता परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आम्हा दोघांसाठी शांती, आनंद आणि सर्वोत्तम गोष्टींसाठी प्रार्थना करते. अफवा पसरवण्याऐवजी, या कठीण काळात सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी मी विनंतीही तिने केली आहे. आमच्या निर्णयाबद्दल कोणीही तर्कवितर्क लावू नयेत. आमच्या वैयक्तिक गोष्टीचा आदर केल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल धन्यवाद असे तिने म्हटले आहे. 

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांच्याबद्दल माहिती

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून तणाव आहे. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये वारंवार येत होत्या. आता, आकृतीने एक पोस्ट शेअर करून याला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. पृथ्वी शॉ हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. मात्र, कामगिरीत सातत्याने घसरण झाल्यामुळे त्याला नंतर संघातून वगळण्यात आले. तो सध्या आयपीएलसाठी संघर्ष करत आहे. आकृती अग्रवालबद्दल बोलायचे झाल्यास, तिने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने 2026 साली प्रदर्शित झालेल्या ‘त्रिमुखा’ या तेलगू चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *