Pravin Tarde on Shahrukh Khan Help for Deool Band 2: प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ (Deool Band2l 2) चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर 80 कोटींचा टप्पा ओलांडत धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची एकच चर्चा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या दिग्दर्शक प्रवीण तरडे ( Pravin Tarde) अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहेत. अलीकडेच केलेल्या एका मुलाखतीत तर त्यांनी देऊळ बंद 2 चित्रपटाला बॉलीवूडच्या किंग खानने म्हणजेच शाहरुख खानने ( Shahrukh Khan) मदत केल्याचं सांगितलं.
काय म्हणाले प्रवीण तरडे ?
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचा डिजिटल फॉरमॅट करण्यासाठी पैसे संपल्याचं सांगितलं. बारा लाखांचं बजेट 42 लाखांपर्यंत पोहोचलं. एवढे पैसे कुठून आणायचे? असा प्रश्न पडल्यानंतर आम्ही शाहरुख खानच्या रेड चिलीज कंपनीला विनंती केली. ही बातमी थेट शाहरुखपर्यंत गेली. आणि नंतर रेड चिलीज ने 40 ते 45 टक्के बिल माफ केलं. असं ‘अभिजात मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी सांगितलं.
ते म्हणाले ‘पुण्यामध्ये हेमंत गुजराती यांचा डॉन नावाचा स्टुडिओ आहे.या चित्रपटाच्या यशासाठी त्यांचेही आभार मानले पाहिजेत.सिनेमाचं बजेट संपलं होतं.सिनेमाचा डीसीपी म्हणजेच थेटर मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी केला जाणारा डिजिटल फॉरमॅट काढण्यासाठी पैसेच नव्हते.सिनेमाचं बजेट 12 लाखांचं होतं.पण ते 42 लाखांपर्यंत पोहोचलं. एवढे पैसे कुठून आणणार ?त्यामुळे आम्ही शाहरुख खान यांच्या रेड चिलीज कंपनीला विनंती केली.ही बातमी शाहरुख खानपर्यंत गेली.त्यांनी तंत्रज्ञानांना सिनेमाबद्दल विचारलं.मुळशी पॅटर्न वाल्याचा सिनेमा आहे म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. कारण सलमानने ‘अंतिम’ सिनेमा केला होता.पैसाला शिवाय डीसीपी काढत नाहीत हा नियम आहे.पण शाहरुखने बिन माफ करायला सांगितलं. सिनेमा चांगला आहे म्हटल्यावर त्यांनी मदत केली.जवळपास 40 ते 45% बिल रेड चिलीजने माफ केलं. सिनेमा चांगला बनवलाय, पैशांचं आपण नंतर बघू, असं त्यांनी सांगितलं. शाहरुख सरांना जे वाटलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना! ‘ असं प्रवीण तर त्यांनी सांगितलं.
दरम्यान, देऊळ बंद 2 चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करतोय.या चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.रमेश परदेशीही सविता मालपेकर, मंगेश देसाई यांसारख्या कलाकारांनी हे महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे घोषणा केली आहे.त्यामुळे हा चित्रपट आणखी किती कोटींचा टप्पा गाठतो? हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार? आणि या चित्रपटाचा पुढचा भाग नेमका कधी पहायला मिळणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष