CWG 2026 : भारताच्या खात्यात आणखी 6 पदकं, अस्मिता डे ने रचला इतिहास ; मात्र नीरज चोप्राकडून निराशा – Marathi News | CWG 2026 Indias Medal Tally Asmita Dey Neeraj Chopra total 23 medals till now know details


कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची कामगिरी

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी शुक्रवार, 31 जुलै हा सर्वात यशस्वी दिवस ठरला. ज्युडो आणि ॲथलेटिक्समध्ये सहा पदके जिंकत भारताने आपल्या एकूण पदकांची संख्या 23 वर नेली आणि ग्लासगोमध्ये आपली स्थिती मजबूत केली. या 23 पदकांमध्ये भारताने 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकं जिंकली आहेत. मात्र, एकूण पदक क्रमवारीत भारत अजूनही 10व्या स्थानावर आहे. तर 24 पदकांसह वेल्स नवव्या स्थानावर आहे. हा दिवस भारताच्या ज्युडोका आणि ट्रॅक अँड फील्ड खेळाडूंमुळे गाजला. भारतीय संघाने 9व्या दिवशी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली. तसेच कॉमनवेल्थ गेम्समध्ये अनेक ऐतिहासिक कामगिरी नोंदवल्या.

भारताचा नामवंत खेळाडू असलेल्या नीरज चोप्राकडून भालाफेकीत सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, मात्र त्याने निराशा केली. नीरजला फक्त रौप्य पदकावर समाधान मानावं लागले. दुसरीकडे, यशवीर सिंहने भालाफेकीत कांस्य पदक जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. याशिवाय बॉक्सिंगमध्येही भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली. भारताच्या सर्व 10 उपांत्य फेरीतील खेळाडूंनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे किमान रौप्य पदक निश्चित झाले आहे. तसेच आगामी दिवसांत आणखी सुवर्ण पदकं मिळण्याची आशा वाढली आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या 9व्या दिवशी पदक जिंकणारे भारतीय खेळाडू :

अस्मिता डे: ज्युडो (महिलांच्या 48 किलो गटात) भारतासाठी पहिले कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक जिंकलं.

हर्ष सिंह: पुरुषांच्या 60 किलो ज्युडो प्रकारात 10-0 असा विजय मिळवत सुवर्ण पदक मिळवलं.

यामिनी मौर्य: महिलांच्या 57 किलो ज्युडो प्रकारात रौप्य पदक जिंकलं.

नीरज चोप्रा: पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत 85.83 मीटर अंतरासह रौप्य पदक जिंकलं.

यशवीर सिंह: पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत 85.41 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक जिंकलं.

तेजस्विन शंकर: डेकॅथलॉनमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरत ऐतिहासिक कांस्य पदक मिळवलं.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील भारताचे सुवर्णपदक विजेते:

मीराबाई चानू: वेटलिफ्टिंग (महिलांचा 48 किलो गट)

शर्मिला धनकड: ॲथलेटिक्स (महिलांची शॉट पुट F57)

दिलीप गावित: ॲथलेटिक्स (पुरुषांची 100 मीटर T47)

अस्मिता डे: ज्युडो (महिलांचा 48 किलो गट)

हर्ष सिंह: ज्युडो (पुरुषांचा 60 किलो गट)

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील भारताचे रौप्यपदक विजेते:

ऋषिकांत सिंह: वेटलिफ्टिंग (पुरुषांचा 60 किलो गट)

मुथुपांडी राजा: वेटलिफ्टिंग (पुरुषांचा 65 किलो गट)

ज्ञानेश्वरी यादव: वेटलिफ्टिंग (महिलांचा 53 किलो गट)

सर्वेश कुशारे: ॲथलेटिक्स (पुरुषांची उंच उडी)

अजय बाबू वल्लुरी: वेटलिफ्टिंग (पुरुषांचा 79 किलो गट)

हरजिंदर कौर: वेटलिफ्टिंग (महिलांचा 69 किलो गट)

गुलवीर सिंह: ॲथलेटिक्स (पुरुषांची 10,000 मीटर शर्यत)

मुरली श्रीशंकर: ॲथलेटिक्स (पुरुषांची लांब उडी)

मोहम्मद बासिल: ॲथलेटिक्स (पुरुषांची 100 मीटर T47)

लवप्रीत सिंह: वेटलिफ्टिंग (पुरुषांचा +110 किलो गट)

यामिनी मौर्य: ज्युडो (महिलांचा 57 किलो गट)

नीरज चोप्रा : ॲथलेटिक्स (पुरुषांची भालाफेक, 85.83 मीटर)

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील भारताचे कांस्यपदक विजेते:

झंडू कुमार: पॅरा पॉवरलिफ्टिंग (पुरुषांचा हेवीवेट गट)

बिंद्याराणी देवी: वेटलिफ्टिंग (महिलांचा 58 किलो गट)

शिल्पा शायला: ॲथलेटिक्स (महिलांची शॉट पुट F57)

सीमा कालीरामना: ॲथलेटिक्स (महिलांची डिस्कस थ्रो)

तेजस्विन शंकर: ॲथलेटिक्स (पुरुषांचा डेकॅथलॉन)

यशवीर सिंह: ॲथलेटिक्स (पुरुषांची भालाफेक, 85.41 मीटर)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *