थायरॉईडला हलक्यात घेताय? काळजी घ्या, त्यामुळे होणारे 5 गंभीर आजार – Marathi News | Taking the thyroid lightly here are 5 serious diseases caused by it


आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार डोकं वर काढतात. त्यातील एक म्हणजे थायरॉईड… आज 100 पैकी 95 लोक थायरॉईडचा सामना करत आहे. हा आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांना मोठ्या प्रमाणात होतो. कारण महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असातत. सांगायचं झालं तर, आपल्याला निरोगी आणि सक्रिय ठेवण्यात विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. मानेच्या पुढच्या भागात असलेली फुलपाखराच्या आकाराची थायरॉईड ग्रंथी शरीरात T3 आणि T4 नावाचे हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स शरीराची चयापचय क्रिया, ऊर्जेची पातळी, हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान आणि इतर अनेक महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवतात. पण जेव्हा ही ग्रंथी योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा अनेक आजार होतात आणि लक्षणं दिसून येतात…

सामान्य थायरॉईड आजारांमध्ये हायपोथायरॉईडीझम, हायपरथायरॉईडीझम, थायरॉईडायटिस, गॉयटर आणि थायरॉईड कर्करोग यांचा समावेश होतो. यापैकी काही विकारांमुळे हार्मोन्सचे असंतुलन होतं, तर काही प्रकरणांमध्ये ग्रंथीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. थायरॉईडचे बहुतेक आजार वेळेवर निदान झाल्यास उपचार करण्यायोग्य असतात, परंतु थायरॉईड कर्करोग सर्वात गंभीर मानला जातो कारण तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

थायरॉईडमुळे होऊ शकणारे 5 आजार

हायपोथायरॉईडीझम : जेव्हा थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात हार्मोन्स तयार करत नाही, तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो. हा आजार स्त्रियांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. सतत थकवा जाणवणे, वजन वाढणे, जास्त थंडी वाजणे, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा आणि केस गळणे ही त्याची लक्षणे आहेत.

हायपरथायरॉईडीझम : यामध्ये थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे शरीराची चयापचय क्रिया वेगवान होते. वेगाने वजन कमी होणे, हृदयाची गती वाढणे, अस्वस्थता आणि चिंता, जास्त घाम येणं, हात थरथरणं आणि झोपेच्या समस्या ही याची मुख्य लक्षणं आहेत. ग्रेव्हज डिसीज हे हायपरथायरॉईडीझमचे सर्वात सामान्य कारण मानलं जातं.

थायरॉईडिटिस : अमेरिकन थायरॉईड असोसिएशनच्या मते, थायरॉईडायटिस म्हणजे थायरॉईड ग्रंथीची सूज. हे संसर्ग, प्रसूतीनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे होऊ शकते. यामुळे घसा खवखवणं किंवा दुखणं, थकवा, हार्मोनच्या पातळीत चढ-उतार आणि वजनात बदल होऊ शकतात.

गलगंड : मेयो क्लिनिकनुसार, गॉयटर म्हणजे थायरॉईड ग्रंथीची असामान्य वाढ, ज्यामुळे व्यक्तीची मान पुढे फुगते. हे आयोडीनची कमतरता, थायरॉईड हार्मोनचे असंतुलन किंवा इतर थायरॉईड रोगांमुळे होऊ शकते. यामुळे घशात सूज येणे, गिळण्यास त्रास होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घशात दाब जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात.

थायरॉईड कर्करोग : अमेरिकन कॅन्सर संस्थेनुसार, जेव्हा थायरॉईडच्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा थायरॉईडचा कर्करोग होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, त्यावर यशस्वीपणे उपचार करता येतात, परंतु हा थायरॉईडच्या सर्वात गंभीर आजारांपैकी एक मानला जातो. यामुळे घशात गाठ येणे, आवाज बसणे, गिळण्यास त्रास होणे, सततचा खोकला आणि घशात सूज येणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे थायरॉईड असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *