Ramdeo Baba on Ramayan: सध्या बॉलीवूडमध्ये 4000 कोटींचं बजेट असणाऱ्या ‘रामायण’ (Ramayan) या चित्रपटाची एकच चर्चा आहे. नमीत मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाचा शनिवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे ट्रेलर लॉन्चचा सोहळा पार पडला. रणबीर कपूर आणि यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या (Trailer Launch) सोहळ्यासाठी बाबा रामदेव यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनी केवळ या चित्रपटाची प्रशंसाच केली नाही तर त्यांच्या खास शैलीत अनेक महत्त्वाच्या आणि मनोरंजक विधानांमुळे सगळ्यांचाच लक्ष वेधून घेतलं. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात इतिहास रचेल. असं म्हणत त्यांनी चित्रपटाचा कौतुक केलं.
काय म्हणाले रामदेव बाबा?
रामायणचा ट्रेलर लॉन्चला उपस्थित असलेले बाबा रामदेव म्हणाले ‘माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित राहिलो आहे.पण इथे येऊन ‘रामायण’चा ट्रेलर पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला.ट्रेलर मध्ये विजुअल्स एवढे कमाल आहेत की जेव्हा स्क्रीनवर बांध चालवलेला दिसतो तेव्हा आपल्यालाच येऊन लागतोय की काय असं वाटतं. रामायणावर आधारित असलेला हा सिनेमा भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात इतिहास रचेल’ असं बाबा रामदेव म्हणाले.
रामायणच्या बजेटवरून बाबा रामदेव यांनी एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थित यामध्ये हशा पिकला होता. ते म्हणाले ‘माझे गुरुजी नेहमी मला सांगायचे की,अभिनय असा केला पाहिजे की तुम्ही ते जगत आहात,असं वाटलं पाहिजे.आणि तुम्ही जीवन असं जगलं पाहिजे की वाटलं पाहिजे अभिनय करत आहात. ट्रेलर पाहिल्यानंतर कळतंय की सगळ्यात कलाकारांनी किती मेहनत केली आहे. जेव्हा मला कळलं की सिनेमाचं बजेट 4000 कोटी आहे हे ऐकून मी थक्क झालो. यावर उपस्थित असलेले प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना हसू आवरलं नाही. ते म्हणाले ‘स्वामीजी,आज तुमच्या स्वतःच्या पतंजली साम्राज्याची किंमत दोन लाख कोटी आहे. ही गोष्ट वेगळी आहे!’ यानंतर उपस्थित यामध्ये हशा पिकला होता.
राम मंदिराच्या देणगी चोरीवरून आहे ते बोलले. बाबा रामदेव यांनी रामचरितमानसमधील एक ओळ म्हटली ‘ हिम ते अनल प्रगत बारू होई, भिमुख राम सुख पावन कोई’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले ‘हिमालयाच्या थंड बर्फातून जरी अग्नी बाहेर पडला तरी, कोणताही जीव प्रभू श्रीरामाच्या भक्तीपासून दूर होऊन कधीही सुख आणि शक्ती प्राप्त करू शकत नाही ‘त्यानंतर ते लगेच हसले आणि म्हणाले ‘आज-काल गोष्टी जरा गोंधळात टाकणाऱ्या आहेत. आता हे कोणी आणि कसे समजून घ्यावं? हे तुम्हीच शोधून काढा, मला एवढंच म्हणायचं आहे. असो माझं नाव रामदेव आहे म्हणून आम्ही रामासाठी जगतो ‘ असं ते म्हणाले.