Akanksha Chamola Get Divorce With Gaurav Khanna: आकांक्षा चमोला आणि टेलिव्हिजन सुपरस्टार गौरव खन्नाचा घटस्फोटाचं धक्कादायक कारण? ‘फिजिकल रिलेशन’मुळे संसारात मिठाचा खडा?


Akanksha Chamola Get Divorce With Gaurav Khanna: टेलिव्हिजन विश्वातील (Television World) अत्यंत लोकप्रिय कपल्सपैकी एक असलेल्या गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) यांच्याबद्दलच्या बातमीनं चाहत्यांना धक्का बसलाय. टीव्ही अभिनेत्री (TV Actress) आकांक्षा चमोला हिनंच यासंदर्भात धक्कादायक माहिती दिलीय. आकांक्षानं ती आणि तिचा पती गौरव खन्ना गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत असल्याचा गौप्यस्फोट केलाय. तसेच, लवकरच दोघेही घटस्फोट घेणार असल्याचंही तिनं जाहीर केलंय. 

गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला या सेलिब्रिटी कपलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसायचे. दोघांना एकमेकांसोबत पाहून चाहतेही खूश व्हायचे. त्यावेळी दोघांमध्ये जे दिसतंय, ते खरं नसून दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय, याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून, तब्बल दहा वर्ष टिकलेलं हे सुंदर नातं आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, यावर कुणाचा विश्वासच बसत नाहीये.

रिअॅलिटी शोच्या मंचावरुन घटस्फोटाची घोषणा (Akanksha Chamola Gaurav Khanna)

आकांक्षा चमोला सध्या ‘लॉक अप 2’ (Lock Upp 2) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालीय. शोच्या अगदी पहिल्याच भागात तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. टेलिव्हिजनचा सुपरस्टार गौरव खन्नासोबतचं तिचं नातं संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून लवकरच त्यांचा अधिकृत घटस्फोट होणार असल्याचं तिनं कॅमेऱ्यासमोर कबूल केलंय. तसेच, गेल्या एका वर्षापासून ती गौरवपासून वेगळी राहत असल्याचंही तिनं उघड केलंय. या अचानक मिळालेल्या माहितीमुळे शोचे प्रेक्षक आणि गौरवचे चाहते आश्चर्यचकित झालेत.

फिजिकल सॅटिस्फॅक्शन आणि घटस्फोट… आकांक्षा नेमकं काय म्हणाली? (Gaurav Khanna Akanksha Chamola)

वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना आकांक्षानं काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलेलं.  ‘हॉटरफ्लाय’ (Hauterfly) ला दिलेल्या मुलाखतीत, आकांक्षा चमोला हिला विचारण्यात आलं की, शारीरिक समाधान मिळत नसल्यास महिलेला पतीपासून वेगळं होण्याचा अधिकार आहे का? त्यावेळी तिनं या मुद्द्यावर अत्यंत परखड मत मांडलेलं. 

आकांक्षा चामोला म्हणाली की, शारीरिक समाधानाचा अभाव हे घटस्फोटाचं एक वैध कारण नक्कीच असू शकतं. ती म्हणालेली की, “जर एखादी महिला तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी किंवा समाधानी नसेल, तर त्याचा थेट परिणाम नात्यावर होतो…” तिनं पुढे बोलताना असंही सांगितलेलं की, आपल्या समाजात महिलांशी संबंधित अशा विषयांवर मोकळेपणानं चर्चा करणं अजूनही निषिद्ध मानलं जातं. याआधी, ‘टेले मसाला’ (Tele Masala) ला दिलेल्या एका मुलाखतीत आकांक्षानं गौरव खन्नाबद्दल एक रंजक टिप्पणी केली होती. हसत हसत ती म्हणालेली की, “जगातील प्रत्येक पत्नीला आपल्या पतीमध्ये काहीतरी दोष किंवा कमतरता आढळतेच, मग तो पती गौरव खन्नासारखा का असेना…” आता चाहते तिच्या या जुन्या वक्तव्यांचा संबंध तिच्या आणि गौरवच्या घटस्फोटाशी जोडत आहेत.

बायकोच्या घटस्फोटाच्या वक्तव्यावर गौरव खन्नाचं मौन (Akanksha Chamola Get Divorce With Gaurav Khanna)

बायकोनं एका रिअॅलिटी शोच्या मंचावर येऊन घटस्फोटाबाबत एवढं मोठं वक्तव्य केलंय. पण तरीसुद्धा अद्याप गौरव खन्नानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यानं या विषयावर पूर्णपणे मौन बाळगलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचं लग्न 24 नोव्हेंबर 2016 रोजी झालेलं. या जोडप्याच्या लग्नाला 10 वर्ष झालीत, पण अजून त्यांना अपत्य नाही. यापूर्वी, ‘बिग बॉस 19’मध्ये गौरव खन्ना यांनं सांगितलेलं की, सुरुवातीला त्याला वडील व्हायची इच्छा होती, पण आकांक्षा त्यासाठी अजिबातच तयार नव्हती. परिणामी, त्यानं आपल्या पत्नीच्या निर्णयाचा आदर केला आणि त्या विचारापासून माघार घेतली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *