Zimbabwe Upset Bangladesh Test : क्रिकेट जगतात आज एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. झिम्बाब्वेने मंगळवारी (30 जून) बांगलादेशचा एक डाव आणि 85 धावांनी पराभव करत कसोटी क्रिकेटमधील आपल्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या क्रमवारीत बांगलादेश सध्या चौथ्या क्रमांकावर असल्याने झिम्बाब्वेचा हा विजय अत्यंत खास मानला जात आहे. मात्र, या पराभवामुळे बांगलादेशच्या WTC रँकिंगला कोणताही धक्का बसणार नाही, कारण झिम्बाब्वे या चॅम्पियनशिपचा भाग नाही.
बांगलादेशच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत बांगलादेशला पहिल्या डावात केवळ 140 धावांवर बाद केले. त्यानंतर फलंदाजी करताना, झिम्बाब्वेने आपल्या पहिल्या डावात 410 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, बांगलादेश दुसऱ्या डावात केवळ 185 धावांवर सर्वबाद झाला आणि अशाप्रकारे मोठ्या फरकाने सामना जिंकून इतिहास रचला.
Zimbabwe record their biggest-ever Test victory with a dominant win over Bangladesh in Harare 👏
📸: @ZimCricketv
📝: https://t.co/A2e3AEvNX2 pic.twitter.com/RXhdF1Ihu2
— ICC (@ICC) June 30, 2026
झिम्बाब्वेच्या विजयात गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका
झिम्बाब्वेच्या विजयात त्यांच्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूमन न्यामहुरीने पहिल्या डावात चार बळी घेतले आणि ब्लेसिंग मुझारबानीने दुसऱ्या डावात चार बळी घेतले. दोन्ही डाव मिळून बांगलादेशकडून केवळ मोमिनुल हक अर्धशतक झळकावू शकला. पहिल्या डावात बांगलादेशचे नऊ फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या डावात मुशफिकुर रहीमने संघासाठी सर्वाधिक 34 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून इनोसेंट कायाने 140 धावा, वेस्ली मधिवायरने 77 धावा, क्रेग एर्विनने 60 धावा आणि ब्रायन बेनेटने 59 धावा केल्या. त्याच्या शानदार शतकासाठी इनोसेंट कायाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
25 वर्षांनंतर सलग दोन कसोटीत विजय
झिम्बाब्वेने तब्बल 25 वर्षांनंतर सलग दोन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी अफगाणिस्तानला एक डाव आणि 73 धावांनी हरवले होते. झिम्बाब्वेच्या क्रिकेट इतिहासात सलग दोन कसोटी जिंकण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे. यापूर्वी त्यांनी एप्रिल 2001 मध्ये बांगलादेशलाच सलग दोन सामन्यांत हरवले होते, तर 1917-98 मध्ये भारत आणि पाकिस्तान विरुद्ध सलग विजय मिळवला होता.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला