Mumbai Rain Tree Collapse : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Heavy Rain) अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या (Tree Collapse) गंभीर घटना समोर येत आहेत. यातच मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळला. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले उपस्थित होते. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तब्बल 10 शाळकरी मुले गंभीररीत्या जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे.
Chembur Bus Accident Rescue : एका विद्यार्थाचा मृत्यू
घटना घडली त्या क्षणी परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असले, तरीही एक शाळकरी मुलगा बसमध्येच अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यामध्ये यश आलं नाही. एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
BMC Fire Brigade Operation : जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू
बसवर कोसळलेले झाड अत्यंत वजनी आणि मोठे असल्यामुळे ते बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने जेसीबी (JCB) मशीन पाचारण करण्यात आलं. जेसीबी आणि अत्याधुनिक कटर्सच्या सहाय्याने बसवर कोसळलेला झाडाचा मोठा भाग कापून बाजूला करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर करण्यात आलं.
Mumbai Hospital Update : जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात हलवले
ही अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडताच प्रशासनाने घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका (Ambulances) पाचारण केल्या आहेत. बसमधून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व 10 गंभीर जखमी मुलांना तातडीने उपचारासाठी जवळच्या पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे. घटनास्थळावरील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण असून पोलीस आणि पालिका अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?